IPL Auction 2025 Live

Flower Supermoon May 2020: आज नागरिकांना घडले सुपरमूनचे दर्शन, पहा फोटो

त्यावेळी चंद्र पूर्णपणे चमकदार दिसल्याचे पहायला मिळाले. या सुपरमुनला सुपर फ्लॉवर मून आणि कॉर्न प्लांटिंग मून अशा नावाने ओखळले जाते.

Flower moon pics (Photo Credits: Twitter)

वर्ष 2020 मधील अंतिम सुपरमुन म्हणजेच आज गुरुवारी दुपारी 4.15 वाजता त्याच्या संपूर्ण आकारात दिसला. त्यावेळी चंद्र पूर्णपणे चमकदार दिसल्याचे पहायला मिळाले. या सुपरमुनला सुपर फ्लॉवर मून आणि कॉर्न प्लांटिंग मून अशा नावाने ओखळले जाते. त्याचसोबत फूल मिल्क मून असे ही म्हटले जाते. नासाच्या मते गुरुवारी दुपारी 4.15 वाजता सुपरमुनचा प्रभाव पाहता येणार आहे. भारतात मात्र नागरिकांना सुपरमुन पाहता येणार नाही आहे. कारण त्यावेळी भारतात दिवस असणार आहे. या दरम्यान, सुर्याची किरणे चंद्रावर पडली असता तो पूर्णपणे झाकला गेला. परंतु ही खगोलीय घटनेा नागरिकांना इंटरनेटवर पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

प्राचीन आदिवासी लोकांनी ऋुतूनुसार चंद्र बदल असल्याने त्यांची नावे ठेवली आहेत. सर्व चंद्रप्रेमींसाठी त्याच्या दृष्टीकोनातून सुपरमून पाहणे हे आनंदाचे आहे. मात्र पृथ्वीच्या परिघात हा चंद्र पाहता येतो. ज्यांना फ्लॉवर सुपरमुनचे दर्शन घडले आहे त्यांनी सोशल मीडियात त्याचे फोटो शेअर केले आहेत.(Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

 

दरम्यान, पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतर 384,400 किमी असते. मात्र सुपरमुनच्या वेळी हे अंतर 23,000 किमी होते. त्यानंतर चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर हे जवळजवळ 361,184 किमी होते. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने अन्य दिवसांच्या तुलनेत चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक चमकदार दिसतो. गेल्या वर्षात 7 एप्रिल दिवशी सुपरमुन नागरिकांना पाहता आला होता.