आश्चर्यकारक! चीनच्या वैज्ञानिकांनी माकडाच्या Cells चे निर्माण केली 2 डुक्करांची पिल्लं

यांच्या शरीरात ब-याच ठिकाणी माकडाच्या कोशिका आहेत. डुक्करांची ही दोन्ही पिल्ले स्टेट सेल आणि प्रजनन जीव विज्ञानाच्या स्टेट प्रयोगशालेमध्ये बनविण्यात आली.

Representative Image (Photo Credits: PixaBay)

जगात कधी कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. त्यात भर म्हणून वैज्ञानिकांचे त्यांच्या लॅबमध्ये दिवसागणिक होणारे प्रयोगही थक्क करणारे आहेत. असाच काहीसा एक नवीन प्रयोग चीनच्या वैज्ञानिकांनी केला आहे. येथील वैज्ञानिकांनी माकडांच्या (Monkey) जनुकांनी दोन हायब्रिड डुक्कर (Pig) बनवले आहेत. न्यू साइंटिस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या वैज्ञानिकांनी डुक्करांच्या भ्रूणांमध्ये माकडाचे Cells टाकून कायमेरा पिगलेट (IVF पद्धतीने डुकराचे पिल्लू) पद्धतीने डुक्कर निर्माण केले. यांच्या शरीरात ब-याच ठिकाणी माकडाच्या कोशिका आहेत. डुक्करांची ही दोन्ही पिल्ले स्टेट सेल आणि प्रजनन जीव विज्ञानाच्या स्टेट प्रयोगशालेमध्ये बनविण्यात आली. मात्र ही पिल्ले 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस जगू शकली नाही. न्यू साइंटिस्टच्या रिपोर्टनुसार जगात पहिल्यांदा वैज्ञानिक डुक्कर-माकड बनविण्यात यशस्वी झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, बीजिंगची स्टेट सेल लॅब आणि प्रजनन जीव विज्ञानाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, ही माकड-डुक्कर बनवण्याची पहिली वेळ आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, 5 दिवसांचे पिगलेट भ्रूणमध्ये माकडाच्या कोशिका होत्या. मात्र या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, यांचा मृत्यू IVF प्रक्रियेमध्ये कोणती तरी समस्या आली असल्यामुळे झाला असावा असे सांगण्यात येत आहे. मात्र त्याचे अधिकृत कारण अजून कळले नसून वैज्ञानिक त्यावर अभ्यास करत आहेत. महाराष्ट्र: डबक्यातील पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणावर अजगराचा हल्ला (Watch Video)

न्यू साइंटिस्टच्या रिपोर्टनुसार, तांग हाय आणि त्यांची टीम जुआन कार्लोस च्या हा विचारांना पुढे नेऊन आनुवांशिका रुपात संशोधित माकडांच्या कोशिकांना 4000 पेक्षा जास्त डुक्कर भ्रूणांमध्ये टाकले. यातून निर्माण झालेले 2 डुकरांची पिल्ले ही हायब्रिड होती. ज्यांचे हृदय, काळीज, फुफ्फुस आणि त्वचा ही माकडांच्या कोशिकांपासून बनली होती.