Dos and Don'ts of Lunar Eclipse: Sex टाळणं ते ग्रहणानंतर आंघोळ; अशी कोणकोणती Myths पाळली जातात?
आजचा चंद्रोदय हा ग्रहण लागलेल्या चंद्राच्या अवस्थेमध्येच असणार आहे.
ग्रहण ही एक अशी खगोलीय घटना आहे. जिचं कुतुहल काहींच्या मनात आजही वैज्ञानिक दृष्टीकोनातून असतं. तर हिंदू धर्मीयांमध्ये काही जण आज 21 व्या शतकामध्येही या घटनेकडे अशुभ- शुभ यामधून पाहतात. आकाशात जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहणाची (Lunar Eclipse) स्थिती निर्माण होते. जो पर्यंत मानवाने वैज्ञानिक दृष्टीमधून पाहून या घटनेबद्दल समाजात चर्चा केली नव्हती तोपर्यंत सर्वसामान्यांना ग्रहणाच्या काळात सुरक्षित ठेवण्यासाठी काही खोट्या गोष्टी रचून सांगितल्या जात असे. त्यापैकीच काही आम्ही तुम्हांलाही सांगणार आहोत. लोकांना लैंगिक संबंध न ठेवण्याचा (Sex) किंवा प्राण्यांवर बसणे टाळण्याचा किंवा ग्रहणानंतर आंघोळ करण्याचा सल्ला देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नकारात्मक उर्जेचा उल्लेख करत लोकांना ग्रहणाच्या काळात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. Chandra Grahan 2022 Dos and Don'ts: चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी काय आहे? सुतक काळात करू नका 'या' चुका, अन्यथा आयुष्यभर होईल पश्याताप.
सेक्स टाळा
DNA ला 2011 मध्ये Astrologer Soniyaa Bhagiyaa यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रग्रहणाच्या काळात किंवा रात्री सेक्स टाळा. हिंदू शास्त्रामध्ये ग्रहण हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या काळात कोणत्याही प्रकारे शारिरीक, लैंगिक संबंध ठेवणं हे भविष्यात दुरगामी वाईट परिणामकारक ठरू शकतात अशी भावना असते.
ग्रहणानंतर आंघोळ
काहींच्या मते ग्रहण काळात अन्न देखील ग्रहण करू नये. ग्रहण काळात अन्नावर अतिरिक्त युव्ही अर्थात अतिनील किरणांचा प्रभाव असतो. त्यामुळे याचा देखील नकारात्मक परिणाम शरिरावर होतो.
ग्रहणामध्ये याप्रमाणेच प्राण्यांवर बसणं टाळा. मनोरंजन टाळा. प्रार्थानांचं पठण करत रहा, देव देवतांना हात लावणं टाळा. असे सांगितलं जातं.
आजचा चंद्रोदय हा ग्रहण लागलेल्या चंद्राच्या अवस्थेमध्येच असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होणार असून त्याची खग्रास स्थिती 3 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्दिष्टाने लिहण्यात आला असून त्यामधील गोष्टींंची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.