Chandrayaan-3: कार्य पूर्ण झाल्यानंतर रोव्हर स्लीप मोडमध्ये- ISRO
विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरने आपले कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे सध्या ते चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे (Vikram Lander) टचडाउन स्पॉट असलेल्या शिवशक्ती पॉईंटवर (Shiv Shakti Point) सुरक्षीत पार्क करुन ते आता स्लीप मोडमध्ये सेट करण्यात आले आहे.
जगभरास कौतुकास प्रात्र ठरलेली चांद्रयान-3 (Chandrayaan-3 ) मोहीम यशस्वी झाली. विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरने आपले कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे सध्या ते चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे (Vikram Lander) टचडाउन स्पॉट असलेल्या शिवशक्ती पॉईंटवर (Shiv Shakti Point) सुरक्षीत पार्क करुन ते आता स्लीप मोडमध्ये सेट करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO ) याबाबत 'X' च्या (पूर्वीचे ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) माध्यमातून शनिवारी सांगीतले.
ISRO ने सांगितले की, रोव्हरने त्याचे कार्य पूर्ण केले आहे. अपेक्षीत काम केल्याने ते आता सुरक्षितपणे पार्क केले आहे आणि स्लीप मोडमध्ये सेट केले आहे. APXS आणि LIBS पेलोड्स बंद आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर प्रसारित केला जातो. सध्या, त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे. स्पेस एजन्सीने असेही सांगितले की पुढील सूर्योदय 22 सप्टेंबर 2023 रोजी अपेक्षित आहे आणि असाइनमेंटच्या दुसर्या सेटसाठी यशस्वी कार्यरत होण्याची आशा आहे.
सौर पॅनेल 22 सप्टेंबर 2023 रोजी अपेक्षित असलेल्या पुढील सूर्योदयाच्या वेळी प्रकाश प्राप्त करण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे. त्याने आपला रिसीव्हर चालू ठेवला आहे. दुसर्या असाइनमेंटच्या यशस्वी प्रबोधनाची त्याला आशा आहे. पण ती पूर्ण झाली नाही तर मात्र ते भारताचे चंद्र राजदूत म्हणून तेथे कायमचे राहील, असे इस्रोने सांगितले. दरम्यान, इस्त्रोने तत्पूर्वी गुरुवारी सांगितले की विक्रम लँडरच्या प्रज्ञान रोव्हर मॉड्यूलने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक नैसर्गिक घटना नोंदवली आहे.