Chandrayaan 3 Launch: ISRO चं महत्त्वाकांक्षी चंद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लॅडिंग करण्यासाठी आज अवकाशात झेपावणार; पहा उड्डाणाची वेळ, Live Streaming ते अन्य महत्त्वाचे तपशील इथे!
दुपारी 2.30 च्या सुमारास ते लाईव्ह पाहता येणार आहे.
Chandrayaan 3 Launch Today Live Streaming: ISRO कडून आज चंद्रावर भारत देश तिसरे मिशन चंद्रयान 3 (Chandrayaan 3) लॉन्च करणार आहे. आज, 14 च्या दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्र मधून प्रक्षेपण होणार आहे. यासाठी दुपारी 1.05 च्या सुमारास अंतिम काऊंट डाऊन सुरू केले जाणार आहे. चंद्रयान 3 मध्ये चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर लॅंडर उतरवला जाणार आहे. जर भारताचा हा प्रयत्न यशस्वी ठरला तर दक्षिणी ध्रुव वर लॅंडर उतरवणारा पहिला आणि चंद्रावर यान उतरवणारा भारत देश चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत हा प्रयत्न रशिया, अमेरिका, चीन कडून करण्यात आला आहे.
चांद्रयान-३ चे प्रक्षेपण LVM-3M4 या रॉकेटमधून केले जाईल, जे अंतराळात अवजड उपग्रह वाहून नेण्यासाठी बनवले गेले आहे. सुमारे एक महिन्यानंतर, म्हणजे 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग (पूर्ण नियंत्रणासह पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग) केले जाईल. चंद्राचा हा भाग अजूनही मानवी नजरेपासून लपलेला आहे. नक्की वाचा: Chandrayaan-3 Launch: चंद्रयान-3 च्या इनकॅप्सुलेटेड असेंबली ला LVM3 सोबत जोडले; ISRO ची माहिती .
Chandrayaan 3 Launch Live Streaming
युट्युबच्या माध्यमातून चंंद्रयान 3 चे लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध करण्यात आले आहे. दुपारी 2.30 च्या सुमारास ते लाईव्ह पाहता येणार आहे.
लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर 14 पृथ्वी दिवसांच्या समतुल्य दिवसात त्यांचे कार्य आणि चाचण्या करतील. विशेष बाब म्हणजे ही वेळ चंद्राच्या एका दिवसाच्या बरोबरीची असेल. चांद्रयान-2 मोहीम 2 019 मध्ये पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी ठरला नव्हता. यंदा इस्रोने या अपयशास कारणीभूत घटकांची पुनर्रचना केली आहे आणि चूका दुरुस्त केल्या आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांना यशाची अपेक्षा आहे.
भारताचे मून-मॅन आणि चांद्रयान-1 चे मिशन डायरेक्टर डॉ. मायालास्वामी अन्नादुराई यांनी चांद्रयान-3 हे अतिशय महत्त्वाचे मिशन असल्याचे म्हटले आहे. भारताने चंद्राच्या परिभ्रमण मार्गाबाबत आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली आहे, आता त्याला सॉफ्ट लँडिंगची क्षमता सिद्ध करावी लागेल. आज जेव्हा भारतीयांसोबतच जगाचे लक्ष देखील या मोहिमेकडे लागले आहे.