ISRO च्या चंद्रयान 2 या मिशनचा हिस्सा असणाऱ्या प्रोजेक्ट डारेक्टर एम वनिता चंद्रयान 3 मधून बाहेर
Vanita) आता इस्रोच्या (ISRO) चंद्रायान 3(Chandrayaan-3) मोहिमेचा हिस्सा नसणार आहेत.
चंद्रयान 2(Chandrayaan-2) या मोहिमेत प्रोजेक्ट डारेक्टर म्हणून भुमिका पार पाडणाऱ्या एम वनिता (M. Vanita) आता इस्रोच्या (ISRO) चंद्रायान 3(Chandrayaan-3) मोहिमेचा हिस्सा नसणार आहेत. तर मिशन चंद्रयान 2 च्या टीमचे नेतृत्व करण्यासाठी रितु करिधाल या चंद्रायान 3 चे मिशन पाहणार आहेत. इस्रो मुख्यालयातून असे सांगण्यात आले आहे की, एम वनिता यांच्या जागी आता पी वीरामुतुवेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रयान 2 या मिशनमध्ये त्याच्या सोबत पाठवण्यात आलेले लॅन्डर विक्रम यांचे व्यवस्थित लॅन्डिंग झाले नव्हते. या मिशनमध्ये एम वनिता यांची टीम चांद्रयान 2 च्या सर्व सिस्टमसाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एम वनिता यांच्या ट्रान्सफर बाबत इस्रोकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान चंद्रयान 2 साठी रितु करिधाल यांना मिशन डायरेक्टर आणि एम वनिता यांना प्रोजेक्ट डायरेक्टर केल्यानंतर त्यांचे इस्रोचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले होते.(ISRO कडून Chandrayaan-3 च्या मोहिमेची तयारी सुरु)
टाइम्स ऑफ इंडिया यांना दिलेल्या एक्सक्लुसिव्ह माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, एम वनिता शानदार वैज्ञानिक आणि चंद्रयान 2 च्या मोहिमेतील प्रोजेक्ट डायरेक्टर यांना पेलोड, डेटा मॅनेजमेंट अॅन्ड स्पेस अॅस्ट्रॉनॉमी एरिया येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. तर पी वीरामुतुवेल यांचे इस्रोच्या मुख्य कार्लायलयातून ट्रान्सफर करत चंद्रयान 2 मोहिमेसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मिशनसाठी एकूण 19 प्रोजेक्ट डायरेक्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे मिशन संबंधित विविध कामे पार पाडणार आहेत. यामधील काहीजण लॅन्डर तर काही जण रोवर यांच्या डेव्हलेपमेंटसाठी काम करणार आहेत.