Chandrayaan 2 Launch Live: चंद्रयान 2 चं लाईव्ह लॉंचिंग घसबसल्या कुठे, कधी पहाल?

6 सप्टेंबर 2019 पर्यंत हे चंद्रयान चंद्रावर पोहचणार आहे.

Chandrayaan 2 spacecraft. (Photo Credits: Twitter/ISRO)

ISRO's Second Moon Mission Launch: चंद्रयान  2 (Chandrayaan 2) या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचं काऊंट डाऊन आता सुरू झालं आहे. चंद्रावरील काही रहस्य उलगडण्यासाठी खास आखलेल्या मोहिमेसाठी भारत सज्ज झाला आहे. चंद्रयान   1 च्या यशस्वी मोहिमेनंतर आता तब्बल 10 वर्षांनी पुन्हा इस्त्रोने (ISRO) एक नवी मोहिम आखली आहे. सोमवार, 15 जुलैच्या मध्यरात्री जीएलएसव्ही मार्क 3 (GSLV MK III) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. 6 सप्टेंबर 2019 पर्यंत हे चंद्रयान चंद्रावर पोहचणार आहे. भारताच्या अवकाशातील संशोधन मोहिमेतील या महत्त्वपूर्ण कामगिरीचं याचि देही याची डोळा अनुभव घेण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. सुमारे 10 हजार लोकं श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रात बनवण्यात आलेल्या खास स्टेडियममधून पाहणार आहेत. मात्र आता ही तिकिट विक्री संपल्याने तुम्हांला जर चांद्रयान 2 चं लाईव्ह लॉन्चिंग पहायचं असेल तर ऑनलाईन आणि सोशल मीडियामध्ये त्याची खास सोय करण्यात आली आहे. ISRO ची महत्वाकांक्षी चंद्रमोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी

कुठे पहाल चंद्रयान  2 चं लॉन्चिंग

चंद्रयान   2 या चंद्रमोहिमेसाठी मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रोचे संशोधक काम करत आहे. अखेर उड्डाणासाठी सज्ज झालेले हे यान 15 जुलैच्या मध्यरात्री 2.51 am ला उड्डाण घेणार आहे. या लॉन्चिंगचं लाईव्ह प्रक्षेपण इस्त्रोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं जाणार आहे. त्यामुळे इस्त्रोच्या Facebook आणि @isro या Twitter अकाऊंटवर पाहता येणार आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मप्रमाणेच टीव्हीवर देखील चंद्रयान  2 चं प्रक्षेपण पाहता येणार आहे. दूरदर्शनवर 1.30 am पासून इस्त्रोच्या मिशन कंट्रोल रूममधून लाईव्ह दाखवले जाणार आहे. 13 भारतीय पेलोड आणि 'नासा'च्या एका उपकरणासह चंद्रयान 2 मिशन अवकाशात झेपावणार, ISRO ची माहिती

चंद्रयान   2 हे चंद्रावर आढळणार्‍या खनिजांचा  अभ्यास करणार आहे. ते चंद्राच्या दक्षिण धुव्राच्या आसपास उतरणार आहे. या भागावर अद्याप कोणतेच संशोधन झालेले नाही. लॉन्च झाल्यानंतर यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेमध्ये पोहचणार आहे. त्यानंतर लॅंडर आणि ऑर्बिटर वेगळे होतील.



संबंधित बातम्या

South Africa Beat Pakistan, 1st Test Day 4 Scorecard: पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून केला पराभव, कागिसो रबाडाची मॅच विनींग पारी, WTC च्या अंतिम फेरीत प्रवेश

South Africa vs Pakistan 1st Test 2024 Day 4 Live Streaming: दक्षिण आफ्रिकेला 121 धावांची गरज तर पाकिस्तानला विजयासाठी 7 विकेटची गरज, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी अन् कुठे घेणार

Australia vs India 4th Test Day 4 Preview: टीम इंडिया चौथ्या दिवशी सामन्यात पुनरागमन करणार की ऑस्ट्रेलीयन गोलंदाज मोठा पलटवार करणार? खेळपट्टी अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती जाणून घ्या

New Zealand Beat Sri Lanka, 1st T20I Match Full Highlights: न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा 8 धावांनी पराभव; फलंदाजांनंतर गोलंदाजांचा धुमाकूळ; पहा सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स