Chandrayan 2: तांत्रिक अडचणींमुळे 'चांद्रयान 2' चं प्रक्षेपण रद्द, लॉन्चिंगची नवीन तारीख ISRO लवकरच करणार जाहीर
भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम 'चांद्रयान 2' चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम 'चांद्रयान 2' (Chandrayan 2) चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले आहे. सोमवारी (15 जुलै) मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी 'चांद्रयान 2' या यानाचे प्रक्षेपण होणार होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. लवकरच प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देखील इस्रोकडून (ISRO) देण्यात आली आहे.
ISRO चं ट्विट:
चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांचा अभ्यास करण्यासाठी हे यान आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावणार होतं. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आता पुन्हा एकदा चांद्रयान 2 चं प्रक्षेपण लांबणीवर पडलं आहे. यापूर्वी दोनदा चांद्रयानाचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते. (Chandrayaan-2 Launch: उद्या पहाटे आकाशात झेपावणार महत्त्वकांक्षी चांद्रयान-2; काउंटडाऊन सुरू)
भारतासोबत जगाचे लक्ष लागलेली ही 'चांद्रयान 2' मोहिम यशस्वी झाल्यानंतर या खास प्रकारची शक्ती असलेला भारत हा चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडे ही विशेष शक्ती आहे.