Chandrayaan-1 ची 11 वी वर्षपूर्ती, जाणून घ्या काही खास गोष्टी

म्हणजे 22 ऑक्टोबर 2008 मध्ये चांद्रयान 1 ची मोहिम करण्यात आल्यानंतर त्याला आज (22 ऑक्टोबर) 11 वर्ष पूर्ण झाले आहेत.

Chandrayaan-1 (Photo Credits-Twitter)

आजच्या दिवशी इस्रोकडून (ISRO) चांद्रयान 1 (Chandrayaan-1) अवकाशात झेपावले होते. म्हणजे 22 ऑक्टोबर 2008 मध्ये चांद्रयान 1 ची मोहिम करण्यात आल्यानंतर त्याला आज (22 ऑक्टोबर) 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र आजही चांद्रयान 1 मुळेच भारताचे नाव गर्वाने घेतले जाते. कारण देशातील हे एक महत्वाचे मिशन होते की, त्याधून जगातील लोकांना चंद्रावर पाणी असल्याचे कळले होते. हा सर्वात मोठा शोध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे इस्रोच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत होते.

तर 11 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी चांद्रयान 1 लॉन्च करण्यात आले होते. या चांद्रयान 1 मोहिमेची कल्पना 1999 मध्ये इंडियन अॅकाडमी ऑफ सायन्स (IAS) यांना सुचली होती. त्यानंतर 2000 मध्ये अॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया यांनी यावर सहमती दाखवली. यासाठी इस्रोकडून लूनार मिशन टास्क फोर्स बनवत त्यामध्ये देशभरातील दिग्गज वैज्ञानिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. 2003 च्या नोव्हेंबरमध्ये पहिल्या चांद्रयान 1 च्या मोहिमेला सकराकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.

सरकारने चांद्रयान 1 ला परवानगी दिल्यानंतर इस्रोच्या विविध सेंटर्स मधील वैज्ञानिक त्याच्या कामासाठी लागले. चांद्रयान 1 चे पूर्ण काम करण्यासाठी जवळजवळ 5 वर्ष लागली. चांद्रयान 1 ने 22 ऑक्टोबरला लॉन्च केल्यानंतर आंतराळात 7 वेळा फेऱ्या मारत 8 नोव्हेंबरला चंद्राच्या पहिल्या कक्षात प्रवेश केला. चार वेळा चंद्राची कक्षा बदलल्यानंतर 12 नोव्हेंबरला चांद्रयान 1 चंद्राच्या अधिक जवळ पोहचले. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी वरती अंतरावर होता. तेथे चांद्रायन 1 ने चंद्राच्या चहूबाजूंनी फेऱ्या मारत 11 महिन्यापर्यंत तेथे कार्यरत होते. परंतु अधिक रेडियएशनमुळे चांद्रयान 1 ची वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचासोबतचा संपर्क तुटला.(Chandrayaan 2 : विक्रम लँडरबाबत आली मोठी बातमी, चांद्रयान 2 विषयी या महिन्यात काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता)

चांद्रायन 1 मोहिमेमुळे देशाला कळले की, चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अस्तित्व आहे. तसेच 3400 फेऱ्यांच्या दरम्यान चांद्रयान 1 ने जवळजवळ 70 हजार थ्री-डी फोटो पाठवले. त्यामध्ये चंद्राच्या 70 टक्क्यांचे फोटो होते. त्याचसोबत टेरेन मॅपिंग कॅमेऱ्यातून पहिल्यांदाच चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो घेण्यात आले. तर 25 मार्च 2009 मध्ये चांद्रयान 1 ने पृथ्वीचा फोटो पाठवला होता.