ई-कॉमर्स (E-commerce) क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अॅमेझॉनने अमेरिकेतील टेक्सास (Texas ) आणि कऐलिफोर्निया (California ) या राज्यांमध्ये चक्क ड्रोनद्वारे ऑर्डर (Amazon Delivery By Drone) पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. एक तासांच्या कालावधीत पोहोचवता येईल अशा अंतरावरील ग्राहकांना वेळेत सेवा देण्याच्या उद्देशाने ऑर्डर्स ड्रोनद्वारे पोहोच केल्या जात आहेत. आयएएनएस वृत्तसंस्थेने दर वर्जच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, लॉकफोर्ड, कॅलिफोर्निया आणि कॉलेज स्टेशन, टेक्सासमधील ग्राहकांना, कंपनीच्या 'अॅमेझॉन प्राइम एअर' ड्रोन सेवेचा वापर करून ड्रोनद्वारे वितरित केलेल्या पार्सलची मर्यादीत सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली.
आमच्या अवकाशात ड्रोनची स्वतंत्र ओळख निर्माण करणे हे आमचे उद्दीष्ठ आहे. आम्ही सुरुवात तर करत आहोत. जेणेकरुन हळूहळू त्याचा विस्तार वाढेल. नागरिकांना त्यांच्या ऑर्डरची डिलिव्हरी अधिक बिनचूकपणे मिळेल अशी आम्हाला आशा आहे, असे Amazon Air च्या प्रवक्त्या नताली बानके (Natalie Banke) यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Amazon Layoffs: अॅमेझॉनमधील राजीनाम्यांची Labour Ministry कडून होणार चौकशी; कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याची शक्यता- Report)
दरम्यान, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) कडून अॅमेझॉन कंपनीला ड्रोनद्वारे ऑर्डर्सची पार्सल पाठविण्यासाठी आवश्यक 'Part 135' मान्यता मिळाली. अॅमेझॉनकडे असलेल्या मान्यतेनुसार लॉकफोर्ड आणि कॉलेज स्टेशनमध्ये राहणारे ग्राहक साइन अप करण्यासाठी आणि ऑर्डर देण्यास पात्र आहेत. ज्यांना अमेऑन ड्रोनद्वारे प्रत्युत्तर देईल. दुसऱ्या बाजूला अॅमेझॉन त्यांच्या परिसरात ड्रोन डिलिव्हरी उपलब्ध असताना इतरत्र राहणाऱ्या ग्राहकांनाही माहिती देईल.
ट्विट
E-commerce giant #Amazon has started delivering orders by drones in the US states of California and Texas with an aim to fly out packages to customers' homes within an hour.@amazon pic.twitter.com/blDo4ujQzS
— IANS (@ians_india) December 29, 2022
ग्राहकाने ऑर्डर केल्यानंतर अॅमेझॉनकडून ट्रँकींग आणि वितरणासाच्या वेळाचा साधारण कालावधी सांगितला जाईल. जेणेकरुन ड्रोन त्यांच्या अंगणात येईपर्यंत ते वाट पाहू शकतील. ड्रोन आले की ते ऑर्डर घेऊ शकतील.