Aliens on Earth? यूएस संरक्षण मंत्रालय Pentagon ला प्राप्त झाले शेकडो UFO अहवाल; एलियन्सबाबत समोर आली मोठी माहिती

यासाठी नासा व पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे, जी यूएफओ आणि एलियन्सची चौकशी करेल.

Alien | (Archived, edited, representative images)

अमेरिकेच्या यूएस संरक्षण विभाग, पेंटागॉनने (Pentagon) शुक्रवारी एलियनच्या (Alien) अस्तित्वाबाबत महत्वाची माहिती दिली. एका पत्रकार परिषदेत पेंटागॉनने सांगितले की त्यांच्या एजन्सीला गेल्या काही महिन्यांत अज्ञात उडणाऱ्या वस्तूंचे (UFO) शेकडो अहवाल प्राप्त झाले आहेत, परंतु आतापर्यंत एलियनचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पेंटागॉनने म्हटले आहे की, त्यांना यूएफओ हे एलियन विमान असल्याचे शेकडो अहवाल प्राप्त झाले आहेत, ज्याची तपासणी केली जात आहे.

पेंटागॉनचा हा अहवाल खूपच धक्कादायक आहे, कारण अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयदेखील या वर्षापासून परग्रहावरील जीवांचा शोध घेण्यासाठी नासाची मदत घेत आहे. यासाठी नासा व पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे, जी यूएफओ आणि एलियन्सची चौकशी करेल. पेंटागॉनने सांगितले की त्यांनी यूएफओचा मागोवा घेण्यासाठी एक नवीन एजन्सी तयार केली आहे आणि एजन्सीने शेकडो यूएफओ अहवाल सादर केले आहेत. (हेही वाचा: आता महिलांशिवाय जन्माला येणार मुले; EctoLife ने सादर केले नवे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर)

दुसरीकडे, पेंटागॉनने असेही म्हटले आहे की, आतापर्यंत एलियनचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पेंटागॉनने जुलैमध्ये ऑल-डोमेन अॅनॉमली रिझोल्यूशन ऑफिस (AARO) ची स्थापना केली होती आणि त्याद्वारे केवळ आकाशातील अज्ञात वस्तूच नव्हे तर UFOs आणि पाण्याखाली किंवा अंतराळातील संभाव्य परदेशी जीवनाचा मागोवा घेण्याचे काम सुरु आहे. यूएस नेव्हीने यूएफओ दिसण्याबाबतचे अहवाल देण्यास सुरुवात केल्यानंतर पेंटागॉनने AARO ची स्थापना केली.

यूएस नेव्हीच्या लष्करी वैमानिकांनी आकाशात अनेक विचित्र घटना आणि विमाने पाहिली आहेत. जून 2021 मध्ये, यूएस ऑफिस ऑफ नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजेंसने अहवाल दिला की, 2004 ते 2021 दरम्यान, यूएफओसह अशा 144 चकमकी झाल्या, त्यापैकी 80 एकाधिक सेन्सरवर कॅप्चर करण्यात आल्या. नासा व्यतिरिक्त हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञही एलियन्सचा शोध घेत आहेत. या वर्षी, संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या चमूने म्हटले आहे की, मानवांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एलियनदेखील प्रयत्न करत आहेत.