IPL Auction 2025 Live

Samsung Launched 2 Smartphones: सॅमसंगने लॉन्च केले दोन परवडणारे स्मार्टफोन; Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत व फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy A04 सह ड्युअल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे, तर Samsung Galaxy A04e सह ड्युअल 13 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A04 (PC - samsung.com)

Samsung Launched 2 Smartphones: स्मार्टफोन ब्रँड Samsung ने आज 19 डिसेंबर रोजी भारतात दोन नवीन परवडणारे फोन Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e लॉन्च केले आहेत. या दोन्ही फोनमध्ये 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम, 4G कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड 12 सपोर्ट आहे. Samsung Galaxy A04 सह ड्युअल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे, तर Samsung Galaxy A04e सह ड्युअल 13 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000 mAh ची बॅटरी उपलब्ध आहे. Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.

Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत

Samsung Galaxy A04 ग्रीन, कॉपर आणि ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे, तर फोनच्या 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Samsung Galaxy A04e लाइट ब्लू आणि कॉपर कलर पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. Samsung Galaxy A04e ची 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,299 रुपये आहे, 3 GB रॅम सह 64 GB स्टोरेज वेरिएंटसाठी 9,999 रुपये आणि 4 GB रॅम सह 128 GB स्टोरेज वेरिएंटसाठी 11,499 रुपये आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअरवरून 20 डिसेंबरपासून खरेदी करता येईल. (हेही वाचा - Jio Phone 5G: लवकरच जिओ लॉन्च करेल सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स)

Samsung Galaxy A04 चे फीचर्स -

Samsung Galaxy A04 सह 6.5-इंच एचडी प्लस डिस्प्लेसाठी सपोर्ट आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. फोनसोबत उच्च सुरक्षेसाठी फेस रेकग्निशन आणि फास्ट डिव्हाईस अनलॉक सपोर्ट देण्यात आला आहे. ड्युअल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप समर्थित आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनसोबत 5,000 mAh बॅटरी आणि टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A04e चे फीचर्स आणि कॅमेरा -

Samsung Galaxy A04e मध्ये 6.5-इंच एचडी प्लस डिस्प्लेसाठी देखील समर्थन आहे. Galaxy A04e सह MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये ड्युअल 13 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमधील सुरक्षिततेसाठी चेहरा ओळखणे आणि जलद डिव्हाइस अनलॉक सपोर्ट आहे. या फोनसोबत 5,000 mAh बॅटरी आणि टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे. बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की, फोनमध्ये AI पॉवर मॅनेजमेंट सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे फोनला 3 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल.