Samsung Galaxy S20 FE 5G भारतात लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
किंमतीच्या तुलनेत Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये तितकीच खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने (Samsung) आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy S20 FE भारतात लाँच केला आहे. हा 5G स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये तितकीच खास आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (Rear Camera Setup) दिला आहे. जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येतो. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 55,999 रुपये आहे. हा फोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरियंटसह येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात 8000 रुपयांचा त्वरित कॅशबॅक मिळत आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन 47,999 रुपयांत मिळत आहे.
हा स्मार्टफोन 31 मार्चपासून Samsung.in, Amazon.in, Samsung Exclusive Stores आणि आउटलेटवर उपलब्ध होईल. किंमतीच्या तुलनेत Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये तितकीच खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.हेदेखील वाचा-Samsung Galaxy M सीरिज मधील पहिला 5G स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत
Samsung Galaxy S20 FE 5G च्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, 6.5 इंचाची डिस्प्ले FHD+सुपर अमोल्ड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले मिळेल. जो 120Hz चा रिफ्रेश रेट आणि पंच होल कटआउटसह येतो. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला आहे. जो 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढविता येऊ शकते.
या फोनमध्ये Android 11 बेस्ड OneUI 3.1 वर काम करतो. या फोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, 12MP वाइड अँगल कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8MP चा टेलिफोटो लेन्स मिळतो. यात 4500mAh ची बॅटरी आणि 15W ची चार्जिंग मिळते. डिवाइस IP68 सर्टिफिकेशनसह येतो.
कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4GLTE, ड्युल बँड वायफाय, ब्लूटुथ 5.0, जीपीएस आणि युएसबी टाईप-सी पोर्ट दिला गेला आहे.