Samsung Galaxy M32 आज भारतात होणार लॉन्च; काय असतील स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत? जाणून घ्या

तत्पूर्वी कंपनीने सॅमसंग इंडिया च्या अधिकृत वेबसाईटवर स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स सादर केले आहेत

Samsung Galaxy M32 (Photo Credits: Amazon India)

साऊथ कोरियन स्मार्टफोन मेकर (South Korean Smartphone Maker) कंपनी सॅमसंग (Samsung) आज गॅलेक्सी एम32 (Galaxy M32) स्मार्टफोन (Smartphone) भारतात लॉन्च करणार आहे. तत्पूर्वी कंपनीने सॅमसंग इंडिया (Samsung India) च्या अधिकृत वेबसाईटवर स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स सादर केले आहेत. मात्र या मोबाईलची किंमत आज दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. लॉन्चनंतर हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर (Amazon India) खरेदीसाठी उपलब्ध असेल.

गॅलेक्सी एम32 मध्ये फुल एचडी+AMOLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 64MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स, 5MP चा डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. (Samsung Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)

Samsung Galaxy M32 (Photo Credits: Amazon India)
Samsung Galaxy M32 (Photo Credits: Amazon India)

या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 SoC  प्रोसेसर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात येण्याची शक्यता आहे. तसंच हा फोन अॅनरॉईड 11 वर आधारित OneUI वर काम करेल. या स्मार्टफोनच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास सॅमसंग गॅलेक्सी एम32 ची किंमत 15000 ते 20000 रुपये असण्याची शक्यता आहे. तर 4GB+54GB मॉडलची किंमत 15,999 रुपये आणि 6GB+128GB वेरिएंटची किंमत 17,999 रुपये असण्याची शक्यता आहे, असे अनेक रिपोर्ट्समधून समोर आले आहे.