Samsung Galaxy F12 उद्या भारतात लाँच होणार लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये

या इव्हेंटमध्ये सॅमसंग आपला एक बजेट स्मार्टफोन देखील लाँच करण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy F12 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) उद्या म्हणजेच 5 एप्रिलला आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy F12 भारतात लाँच करणार आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट (Flipkart) उद्या दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात येईल. या इव्हेंटमध्ये सॅमसंग आपला एक बजेट स्मार्टफोन देखील लाँच करण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy F02s असे या बजेट स्मार्टफोनचे नाव असेल. सॅमसंग गॅलेक्सी एफ12 मध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Samsung Galaxy F12 स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर #FullOnFab नावाने प्रमोट केला जात आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यामध्ये 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात 90Hz रिफ्रेश रेट असलेली PLS IPS स्क्रिन दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.हेदेखील वाचा- Samsung Galaxy S20 FE 5G भारतात लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Samsung Galaxy F12 च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असेल. त्याशिवाय फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर, 2MP चा मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेंसर मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा असू शकतो.

त्याचबरोबर Samsung Galaxy F12 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये USB Type-C पोर्ट दिला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक दिला आहे. तसेच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा असू शकतो.