Samsung चे 3 स्मार्टफोन्स A30, A50 आणि A10 लॉन्च, पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy A30, Samsung Galaxy A50 आणि Samsung Galaxy A10 हे आहेत ते तीन स्मार्टफोन.

Samsung 3 Smartphones Launched (Photo Credit: File Photo)

सॅमसंगने (Samsung) Samsung Galaxy A30, Samsung Galaxy A50 आणि Samsung Galaxy A10 हे तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,  दोन हॅंडसेट 6.4 इंचाची इनफिनिटी यू सुपर एमोलेड स्क्रिन देण्यात आली आहे. याशिवाय Samsung Galaxy A30 आणि Galaxy A50 मध्ये 4,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. 6/64GB असलेल्या सॅमसंग A50 ची किंमत 22900 रुपये आणि 4/64 ची किंमत 19990 रुपये. तर A30 ची किंमत 16990 रुपये आणि Galaxy A10 ची किंमत 8490 रुपये आहे.

Samsung Galaxy A50

यात तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहे. याशिवाय यात एफ/1.7 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात एफ/ 2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा सेंसर आणि एफ/ 2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेंसर काम करेल. पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A30

यात दोन रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. यात एफ/ 1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसरसोबत एफ/ 2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. यात फ्रंट पॅनलवर एफ/ 2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सॅमसंग गॅलक्सी ए10 मध्ये एफ/ 1.9 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A10

फ्रंट पॅनेलवर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय अतिरिक्त सॅमसंग गॅलेक्सी ए10 मध्ये एफ/ 1.9 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलवर एफ/ 2.0 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. यात 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरचे फिचर देण्यात आलेले नाही. फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक फिचरचा वापर तुम्ही करु शकता. याचे डायमेंशन 155.6x75.6x7.94 मिलीमीटर आहे. चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी यात मायक्रो युएसबी पोर्ट देण्यात आले आहे.