Samsung Galaxy A20: आजपासून विक्रीसाठी होणार खुला; पहा सॅमसंग गॅलेक्सी A20 स्मार्टफोनची फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत
सॅमसंगने नुकताच लॉन्च केलेला Galaxy A20 हा स्मार्टफोन आजपासून (8 एप्रिल) विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे
सॅमसंगने नुकताच लॉन्च केलेला Galaxy A20 हा स्मार्टफोन आजपासून (8 एप्रिल) विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी सॅमसंगने A10,A30 या स्मार्टफोनचीदेखील घोषणा केली होती. आजपासून विक्रीसाठी खुल्या झालेल्या Galaxy A20 चं खास आकर्षण म्हणजे
4000mAh बॅटरी आणि Infinity-V डिस्प्ले डिझाईन. साऊथ कोरियन कंपनीचा हा स्मार्टफोन नेमका कसा आहे? पहा त्याची स्पेसिफिकेशन्स
Galaxy A20 स्पेसिफिकेशन्स
- Galaxy A20 हा एक मिड रेंज हॅन्डसेट आहे. हा Exynos 7884 octa-core SoC वर चालतो.
- 3GB RAM असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 64GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डसह ते 512GB पर्यंत वाढवता येऊ शकतं.
- 6.4-inch HD+ सोबत 720x1560 pixels पाहता येऊ शकतं.
- Android 9 Pie वर चालणारा हा स्मार्टफोन rear-mounted फिंगर प्रिंट सेंसरसोबत काम करतो.
- Galaxy A20 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. 13MP +5MP ड्युअल रेअर कॅमेरा आहे. यामध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे.फ्रन्ट कॅमेरा 8MP sensor आणि मागील कॅमेरा 5MP सेंसर फ़ीटेड अल्ट्रा वाईड लेंससोबत आहे.
- 4000mAh बॅटरीवर चालणारा या मोबाईलसाठी Type-C connectivity युएसबी चार्जिंगसाठी आहे.
किंमत - 12,490 रूपये.
रंग़ - Galaxy A20 लाल, काळा आणि निळा अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ई कॉमर्स साईट्ससोबतच Samsung Opera House,सॅमसंग ऑनलाईन स्टोअरवरदेखील उपलब्ध आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)