RIL AGM: Jio Giga Fiber सोबत HD TV फ्री ;Jio Phone 3 लॉन्चिंगसाठी तयार; मुकेश अंबानी यांनी दिली माहिती, जाणून घ्या अधिक
FTTH याचा अर्थ असा की, जर आपल्याला इंटरनेट सेवा हवी असेल तर, तुमच्या घराबर्यंत एक केबल दिली जाईल. आता ज्या केबलद्वारे आपल्याला इंटरनेट मिळते ते स्पीडसाठी योग्य नाही. FTTH च्या माध्यमातून ग्राहकाला अधिक स्पीड मिळेल. या सेवेसाठी वापरण्यात येणारी केबल इतर सेवांच्या तुलनेत अधिक वेगवान कनेक्टिविटी पुरवते.
Reliance Industries AGM 2019: रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आज (12 ऑगस्ट 2019) जिओ फायबर प्लान घोषीत केला. या घोषणेनुसार 5 डिसेंबर 2019 पासून जिओ वापरकर्त्यांना 1 जीबीपीएस स्पीडने इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. जिओ गीगा फायबर प्लानची सुरुवात 700 रुपयांनी होईल आणि त्याची रेंज 10,000 रुपयांपर्यंत जाईल. या शिवाय, जिओचे मिक्स रियल्टी (MR) ही सादर करण्या आले. ज्याचे नाव जिओ होलोबोर्ड असे आहे. बाजारात लवकरच याची विक्री सुरु केली जाणार आहे.
दरम्यान, या वेळी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, रिलायन्स ही भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारी कंपनी आहे. तसेच, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातही सर्वाधिक नफा मिळवणारी कंपनीही रिलायन्सच ठरली आहे. या वेळी अंबानी यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. (हेही वाचा, जास्त पैसे मोजूनही तुमचे इंटरनेट स्लो चालतंय? त्यासाठी आवश्यक आहे 'नेट न्यूट्रॅलिटी')
मुकेश अंबनी यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणा
- जिओ वापरकर्त्यांना इंटरनेट सेवा 100 एमबीपीएस इतक्या स्पीडने सुरु होईल आणि ती 1 जीबीपीएस पर्यंत जाईल.
- 700 ते 10000 हजार रुपये प्रतिम महिना या दरात प्लान उपलब्ध असतील.
- ग्राहक केवळ डाटा किंवा व्हॉयस सर्विसच्या माध्यमातून शुल्क भरु शकतील.
व्हॉइस कॉल पूर्णपणे मोफत असतील.
- आंतरराष्ट्रीय कॉलिंग पॅक 500 रुपये प्रतिमहिना (अमेरिका आणि कॅनडामध्ये फिक्स लाईनसाठी)
- जिओ फायबर प्लान सर्व ओटीटी अॅप्लीकेशनमध्ये उपलब्ध
- प्रीमियम जिओ फायबर ग्राहक हे त्या दिवशी प्रदर्शित होणारा चित्रपट पाहू शकतात.
जिओ फॉर एव्हर प्लान घेणाऱ्यांसाठी 4K टीव्ही आणि सेट टॉप मोफत मिळेल.
काय आहे जिओ गिगा फायबर
JioGigaFiber फायबर टू द होम म्हणजेच FTTH वर आधारीत आहे. FTTH याचा अर्थ असा की, जर आपल्याला इंटरनेट सेवा हवी असेल तर, तुमच्या घराबर्यंत एक केबल दिली जाईल. आता ज्या केबलद्वारे आपल्याला इंटरनेट मिळते ते स्पीडसाठी योग्य नाही. FTTH च्या माध्यमातून ग्राहकाला अधिक स्पीड मिळेल. या सेवेसाठी वापरण्यात येणारी केबल इतर सेवांच्या तुलनेत अधिक वेगवान कनेक्टिविटी पुरवते. सध्यास्थितीत ग्राहकांकडे असलेल्या केबलच्या तुलनेत ही केबल कितीतरी अद्ययावत असेन. ज्यामुळे ग्राहकाला हाय स्पीड केक्टिविटी तर मिळेल. पण ऑनलाईन गेमिंगही पहिल्यापेक्षा अधिक वेगवान होईल.