IPL Auction 2025 Live

Reliance Jio चा सर्वात स्वस्त 199 रुपयांचा नवीन प्लान ज्यात मिळणार 'ही' महत्त्वाची सेवा

या प्लानमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. दिवसाला 1.5 जीबी डेटा देणारा कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. 28 दिवस ग्राहकाला या हिशोबाने 42 जीबी डेटा मिळतो. यामध्ये जियो टू जियो कॉलिंग अनलिमिटेड आहे.

Reliance Jio | (File Photo)

भारतातील अग्रगण्य टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपला नवा स्वस्त डेटा प्लान आणला आहे. यात 199 रुपयांमध्ये 42GB डेटा मिळणार आहे. नवीन वर्षात BSNL कंपनी सोडून देशातील अन्य टेलिकॉम कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात त्यांच्या प्रीपेड प्लान्सची किंमत वाढवली आहे. मात्र त्यात आता Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. त्यांच्या या नवीन 199 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दिवसा 1.5GB डेटा वापरता येणार आहे. जिओनेही आपल्या प्लान्समध्ये वाढ केली असली तरीही त्यांचे प्सान्स इतर कंपन्यांच्या तुलनेत 25% स्वस्त असल्याचा दावा केला जात आहे.

Reliance Jio च्या या नव्या प्लानमध्ये 199 रुपयांत दिवसा 1.5GB डेटा आणि 100 मोफत एसएमएस मिळणार आहेत. या प्लानमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. दिवसाला 1.5 जीबी डेटा देणारा कंपनीचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. 28 दिवस ग्राहकाला या हिशोबाने 42 जीबी डेटा मिळतो. यामध्ये जियो टू जियो कॉलिंग अनलिमिटेड आहे.

हेदेखील वाचा- मुंबई शेअर बाजाराचा मुकेश अंबानीं च्या रिलायन्स जिओला फटका

जियोचा हा प्लॅन खासकरुन त्या ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे, जे कॉलिंगपेक्षा जास्त डेटाचा वापर करतात. एअरटेल आणि वोडाफोन सारख्या कंपन्या अशा प्रकारच्या प्लॅनसाठी जवळपास 250 रुपये चार्ज करतात.

रिलायन्स जिओ यांच्या युजर्सला आता नेटवर्कशिवाय अन्य व्यक्तीला कॉलिंग करता येणार आहे. म्हणजेच जिओ कंपनीने त्यांच्या VoWiFi ची सुविधा ग्राहकांसाठी लॉन्च केली आहे. एअरटेलने त्यांची VoWiFi सर्विस डिसेंबर 2019 मध्ये लॉन्च केली होती. एअरटेलच्या VoWiFi सर्विस फक्त एक्सट्रीम फायबरसह वापर करता येणार आहे. तर जिओ VoWiFi सर्विसची खासियत अशी आहे की, ही फक्त जिओ फायबर सर्विसपूर्ती मर्यादित नसून युजर्स याचा वापर इनडोर-वायफायसोबत पब्लिक वायफायसह हॉस्पॉटच्या माध्यमातून करु शकणार आहेत. एअरटेलची वॉईस ओवर वायफाय सर्विस दिल्लीसह मुंबई, कोलकाता, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू नंतर अन्य ठिकाणी सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.