Jio GigaFiber चे सर्वात स्वस्त होम ब्रॉडबँड सर्व्हीस पॅकेज; जाणून घ्या ऑफर्स आणि किंमत
हे नवे पॅकेज लोव्हर सिक्युरिटी डिपॉझिट पॅकेजसह सादर करण्यात आले आहे.
नव्या पॅकेजसाठी तुम्हाला 2,500 रुपये मोजावे लागतील. गेल्या वर्षी सादर केलेल्या ब्रॉडब्रँड सर्व्हिसच्या तुलनेत ही सेवा 2000 रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सिक्युरिटी डिपॉजिट 4,500 रुपये ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र आता सादर करण्यात आलेल्या ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनल (ONT) सर्व्हीसची किंमत कमी असूनही याचे स्पीड 100Mbps वरुन कमी करुन 50Mbps करण्यात आला आहे.
ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनल या नव्या सेवेअंतर्गत ड्युअल ब्रँड कनेक्टीव्हीटी ऐवजी सिंगल बँड सपोर्ट मिळेल. पूर्वीच्या पॅकेजमध्ये फ्री मध्ये 100mbps स्पीडसह 100GB डेटा मिळेल. याचे बीटा टेस्टिंग सध्या सुरु आहे. यासोबत राऊटर सह 4,500 रुपयांचे वन-टाइम डिपॉझिट घेतले जात आहे. याऐवजी नव्या पॅकेजमध्ये वन-टाइम डिपॉझिट अंतर्गत फक्त 2,500 रुपये भरावे लागतील.
2,500 रुपयांच्या Jio GigaFiber सर्व्हीसमध्ये सिंगल ब्रँड राऊटर, 50Mbps चे स्पीड लिमिट, वॉयस सर्व्हीस आणि प्रति महिने फ्री 1,100GB डेटा मिळेल. तर युजर्स जिओफायबर कनेक्शनमध्ये प्रत्येक महिन्याला 1,100 जीबी डेटा वापरु शकतील.
गीगा फायबर एक ऑप्टिकल बेस्ड होम ब्रॉडब्रँड सर्व्हीस आहे. JioGigaFiber फाइबर टु द होम म्हणजेच FTTH वर आधारीत आहे. FTTH दोन सर्व्हीसेज सोबत येतो. जिओ गीगाफायबर राऊटर आणि दुसरा जिओ गीगाटीव्ही सेट टॉप बॉक्स. हे आतापर्यंत देशातील 1,400 शहरात लॉन्च झाले आहे.