Reliance JIO IPO: मुकेश अंबानी लवकरच रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा IPO बाजारात आणणार; एलआयसीचा रेकॉर्ड तोडणार?

येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात ही वार्षिक बैठक होणार आहे.

Reliance Jio (Photo Credit: Facebook)

जगप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी लवकरच रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे. तशी तयारी केली जात असल्याचा दावा केला जातोय. जिओ इन्फोकॉमचा आयपीओ येणार असेल तर आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आयपीओ असेल, असे सांगितले जात आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही टेलिकॉम कंपनी आपला आयपीओ घेऊन येऊ शकते. एकूण 55 हजार कोटी रुपयांचा हा आयपीओ असेल, असे सांगितले जात आहे. सध्या सर्वांत मोठ्या आयपीओचा रेकॉर्ड हा एलआयसीच्या नावावर आहे. ही एक सरकारी विमा कंपनी आहे. मे 2022 मध्ये या कंपनीने आपला विमा आणला होता. या आयपीओचा आकार तेव्हा 21 हजार कोटी रुपये होता. ( Zomato Relaunches Intercity Legends Service: झोमॅटोने पुन्हा सुरू केली 'इंटरसिटी लीजेंड्स' सेवा; आता ग्राहकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार)

रिलायन्स इंडस्ट्रिज उद्योग समुहाच्या वार्षिक बैठकीनंतर रिलायन्स जिओच्या आयपीओबद्दलचे नेमके चित्र स्पष्ट होईल. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात ही वार्षिक बैठक होणार आहे. हा आयपीओ साधारण 55,500 कोटी रुपये असू शकतो, असे सांगितले जात आहे. याआधी पेटीएमची पॅरेन्ट कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचा आयपीओ हा सर्वांत मोठा होता. नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने आपला 18,300 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता.

दुसरीकडे वाहनिर्मिती क्षेत्रातील दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई या कंपनीची ह्युंदाई इंडिया ही स्थानिक कंपनीही आयपीओ आणण्याची शक्यता आहे. त्यासाठी ह्युंदाई इंडियाने आईपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट फाईल केलेला आहे. आयपीओच्या ड्राफ्टनुसार ह्युंदाईचा आयपीओ 25 हजार कोटी रुपये असू शकतो.