Reliance Jio Independence Day offer: JioFi युजर्संना मिळणार 5 महिने फ्री डेटा आणि कॉलिंग; स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलायन्स जिओची खास ऑफर
या ऑफर अंतर्गत युजर्संना 5 महिन्यांसाठी फ्री डेटा देण्यात येणार आहे. तसंच जिओ-टू-जिओ अनलिमिडेट फ्री कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या युजर्ससाठी खास ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्संना 5 महिन्यांसाठी फ्री डेटा (Free Data) देण्यात येणार आहे. तसंच जिओ-टू-जिओ (Jio to Jio) अनलिमिडेट फ्री कॉलिंगची (Unlimited Free Calling) सुविधा देखील मिळणार आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्संना नवीन जिओ-फाय (JioFi) डिव्हाईस खरेदी करावे लागणार आहे. याची किंमत 1999 रुपये इतकी आहे. हे नवे वाय-फाय डिव्हाईस रिलायन्स डिजिटल आणि जिओ स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर युजर्स जिओच्या ऑफिशियल वेबसाईटवरुनही हे डिव्हाईस प्लॅनसह खरेदी करु शकतात.
डिव्हाईस खरेदी केल्यानंतर ते सिम कार्ड घालून अॅक्टीव्हेट करावे लागेल. अॅक्टीव्हेशन रिचार्जच्या प्लॅनची किंमत 199 रु., 249 रु. आणि 349 रुपये इतकी आहे. याशिवाय जिओ प्राईम मेंबरशिपसाठी 99 रुपये अधिक भरावे लागतील. जिओच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अॅक्टीव्हेशन करताना युजर्संना 3 पैकी एक रिचार्ज प्लॅन निवडावा लागेल. रिचार्जनुसार युजर्संना लाभ मिळतील.
199 रुपयांचा प्लॅन:
199 रुपयांच्या रिचार्ज अंतर्गत युजर्संना 1.5GB चा हाय स्पीड डेटा दररोज मिळेल. तसंच जिओ टू जिओ फ्री अनलिमिडेट कॉल्सही मिळतील. तर इतर नेटवर्कवर कॉल केल्यास 1000 मिनिटे आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लॅनची व्हॅलिटीडी 28 दिवसांची आहे.
249 रुपयांचा प्लॅन:
249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 2GB डेटा आणि जिओ टू जिओ फ्री कॉल्सचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर इतर नेटवर्कसाठी 1000 मिनेटे आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटीही 28 दिवसांची आहे.
349 रुपयांचा प्लॅन:
349 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असून यात 3GB डेली डेटा आणि अनलिमिडेट जिओ टू जिओ कॉल्सची सुविधा देण्यात आली आहे. तसंच इतर नेटवर्क्ससाठी 1000 मिनिटे आणि 100 एसएमएस दिले जातील.
पोस्टपेट युजर्संसाठी हा प्लॅन नसून केवळ नवे वाय-फाय डिव्हाईस खरेदी करणाऱ्या युजर्संनाच याचा लाभ मिळणार आहे.