रिलायन्स जिओचे 251 रुपयांचे प्रसिद्ध 4 जी डेटा व्हाऊचर बंद; त्याऐवजी सुरू केला 'वर्क फ्रॉम होम पॅक'
ग्राहकांना या डेटा व्हाउचरमध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटा देत होती. या पॅकची वैधता एक महिन्यापेक्षा अधिक होती. लॉकडाऊन काळात ग्राहकांना हा पॅक चांगलाचं पसंत पडला होता. या प्लानमध्ये कंपनी युजर्संना अॅक्टिव प्लानच्यावर टॉप-अप करीत होते. तसेच युजर्संना या अंतर्गत अतिरिक्त डेटा बेनिफिटही मिळत होते.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) 251 रुपयांचा प्रसिद्ध 4 जी डेटा व्हाऊचरला बंद केले आहे. ग्राहकांना या डेटा व्हाउचरमध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटा देत होती. या पॅकची वैधता एक महिन्यापेक्षा अधिक होती. लॉकडाऊन काळात ग्राहकांना हा पॅक चांगलाचं पसंत पडला होता. या प्लानमध्ये कंपनी युजर्संना अॅक्टिव प्लानच्यावर टॉप-अप करीत होते. तसेच युजर्संना या अंतर्गत अतिरिक्त डेटा बेनिफिटही मिळत होते.
जिओच्या या पॅकमुळे ग्राहकांची संख्या वाढली होती. मात्र, काही युजर्संना यात कॉलिंग आणि फ्री एसएमएसची सुविधा मिळत नसल्याने नाराजी होती. जिओने या पॅकऐवजी 'वर्क फ्रॉम होम पॅक' ची ऑफर सुरू केली आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड 50 जीबी डेटा दिला जात आहे. ग्राहकांना या प्लानसोबत अतिरिक्त रिचार्जही करता येते. विशेष म्हणजे या पॅकमध्ये कॉलिंग किंवा फ्री एसएमएसची सुद्धाही दिला जात आहे. (हेही वाचा - Good Morning बोलताच तुमचा स्मार्टफोन देणार बातम्या आणि हवामानाची माहिती, Google ची नवी ट्रिक)
रिलायन्स जिओने सुरू केलेला 'वर्क फ्रॉम हॉम' पॅक ग्राहकांच्या किती पसंतीस पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात लोक आपला जास्तीत-जास्त वेळ मोबाईल तसेच इंटरनेटवर घालवतात. त्यामुळे जिओचा हा नवीन पॅक ग्राहकांना नक्की पसंतीस पडले.