खुशखबर! Reliance Jio ने आपल्या 'Work From Home' च्या प्लान्सची वैधता वाढविली, पाहा कोणते आहेत Plans?

नव्या बदलानुसार, या प्लान्सची वैधता वाढवून 30 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे.

Reliance Jio (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन 4.0 ची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन आधीच्या तीनही लॉकडाऊनपेक्षा वेगळा असणार आहे. त्यामुळे कोणत्या राज्यात याचे कायम नियम असतील हे 18 मे पर्यंत कळेलच. मात्र अनेक अनेक कर्मचा-यांना अजून काही दिवस तरी वर्क फ्रॉम होम (Work From Home)  करण्यास त्यांच्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपले वर्क फ्रॉम होम च्या प्लान्समध्ये थोडे बदल केले आहेत. नव्या बदलानुसार, या प्लान्सची वैधता वाढवून 30 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे.

Reliance Jio च्या 151, 201 आणि 251 रुपयाचे हे प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये इतर काहीही बदल न करता केवळ याची वैधता 30 दिवसांची केली आहे. यातील 251 रुपयाच्या प्लानमध्ये 50GB, 201 रुपयाच्या प्लानमध्ये 40GB आणि 151 रुपयाच्या प्लानमध्ये 30GB इंटरनेटा डेटा मिळत आहे. Reliance Jio च्या रिचार्जवर युजर्सला मिळणार जबरदस्त कॅशबॅक, 'या' पद्धतीने लाभ घ्या

दरम्यान 30 दिवसांच्या कालावधीत जर इंटरनेट डेटा संपला तर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा वेळी ग्राहकांसाठी जिओ ने 4G Data Voucher प्लान आणले आहे. ज्यात 11 रुपये, 21 रुपये, 51 आणि 101 रुपयाचे वाउचर मिळत आहे.

11 रुपयामध्ये 800GB, 21 रुपयात GB, 51 रुपयात 6GB आणि 101 रुपयात 12GB डेटा मिळत आहे. याचाच अर्थ लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला चांगला इंटरनेट स्पीडसुद्धा मिळेल तसेच या प्लान्सच्या माध्यमातून 30 दिवसांची वैधता सुद्धा मिळेल.

लॉकडाऊन काळात जिओच्या प्रीपेड युजर्सची होणारी गैरसोय लक्षात घेऊन टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) एक विशेष सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे प्रीपेड युजर्स आता देशातील कोणत्याही ATM द्वारे मोबाईलमध्ये रिचार्ज करु शकतात. यासाठी रिलायन्स कंपनीने देशातील सर्व मोठ्या बँकांशी हातमिळवणी केली आहे.