Relaince Jio आणि Vi ने लाँच केला 401 रुपयांचा प्लान; दोन्हींच्या पॅकवर मिळेल Disney + Hotstar चं सब्सक्रिप्शन; जाणून घ्या कोणती योजना ठरेल फायदेशीर

दोन्ही कंपन्यांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची असून यावर अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात येत आहे. मात्र, Vi च्या प्लानमध्ये ग्राहकांना थोडा जास्त डेटा मिळत आहे.

Relaince Jio, Vi (PC - PTI)

व्होडाफोन-आयडिया (Vi) ने अलीकडेच चार नवीन प्रीपेड योजना सुरू केल्या आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी (Disney+ Hotstar VIP) सदस्यता मिळते. हे सब्सक्रिप्शन स्वतंत्रपणे घेण्यासाठी आपल्याला 399 रुपये खर्च करावे लागतात. Disney+ Hotstarसह Vi चा सर्वात स्वस्त प्लान 401 रुपयांचा आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स जिओ देखील 401 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. चला तर मग यापैकी कोणता प्लान अधिक चांगला आहे, हे जाणून घ्या.

Vi चा 401 रुपयांचा प्लान -

401 रुपयांचा व्होडाफोन-आयडिया प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 3 जीबी डेटा आणि 16 जीबी अतिरिक्त डेटा आहे. अशा प्रकारे, वापरकर्ते एकूण 100 जीबी (84 + 16) डेटा वापरण्यास सक्षम आहेत. या योजनेत सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज देण्यात येतील. यात ग्राहकांना एका वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीची सदस्यता मिळते. या सर्वांव्यतिरिक्त, ग्राहकांना वीकेंड डेटा रोलओव्हर, फ्री नाइट डेटा आणि Vi Movies & TV VIP मध्ये प्रवेश देखील मिळतो. (वाचा - Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता रिचार्जसह Health Insurance चा घेता येणार लाभ)

401 रुपयांचा Jio प्लान -

व्ही प्रमाणे रिलायन्स जिओच्या 401 रुपयांच्या योजनेत Disney+ Hotstar ची 1 वर्षासाठी सदस्यता मिळते. या 28 दिवसांच्या योजनेत दररोज 3 जीबी डेटा + 6 जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण 90 जीबी डेटा देण्यात येतो. दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस व्यतिरिक्त, जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता देखील उपलब्ध आहे.

ग्राहकांना कोणत्या योजनेचा फायदा अधिक मिळेल -

दोन्ही कंपन्या डिस्ने + हॉटस्टारसाठी एकाच किंमतीच्या प्लानवर मेंबरशिप देत आहेत. दोन्ही कंपन्यांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची असून यावर अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देण्यात येत आहे. Vi च्या प्लानमध्ये ग्राहकांना थोडा जास्त डेटा मिळत आहे. याशिवाय ग्राहकांना रात्री 12 ते 6 या वेळेत अमर्यादित डेटा वापरण्याची सुविधादेखील मिळत आहे. तसेच या प्लानमध्ये आठवड्याचा उर्वरित डेटा आठवड्याच्या शेवटी वापरला जाऊ शकतो. या दोन्ही सुविधा रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये उपलब्ध नाहीत.