Jio, Airtel आणि Vodafone चा 50 रुपयांहून स्वस्त प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंग सह मिळणार फ्री डेटा
यात डेटा आणि कॉलिंग या दोन्ही सुविधा युजर्संना मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे प्लॅन्स 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत.
सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटाशी निगडीत अनेक समस्यांचा नागरिक सामना करत आहेत. यात आर्थिक बाजू अत्यंत महत्त्वाची आहे. ही बाब लक्षात घेत Jio, Airtel आणि Vodafone या कंपन्यांनी स्वस्त प्लॅन्स सुरु केले आहेत. यात डेटा आणि कॉलिंग या दोन्ही सुविधा युजर्संना मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्लॅन्स 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात जिओचे प्लॅन्स 10, 20 आणि 50 रुपयांचे असून एअरटेलचे प्लॅन्स 19, 48 रुपयांचे आहेत. तर वोडाफोनचा प्लॅन 19 रुपयांचा आहे. तर जाणून घेऊया या प्लॅन्समध्ये कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत... (रिलायन्स जिओचा नवा 'Work From Home Pack'; दररोज मिळणार 2 GB डेटा)
Jio चा 10 रुपयांचा प्लॅनः यात युजर्संना 7.47 रुपयांचा टॉकटाईम दिला जाईल. त्याचसोबतच 1 जीबी डेटा आणि नॉन-जिओ युजर्संना कॉल करण्यासाठी 124 मिनिट्स फ्री दिले जातील. याची व्हॅलिटीडी अनलिमिटेड आहे.
Jio चा 20 रुपयांचा प्लॅनः यात युजर्संना 14.95 रुपयांचा टॉकटाईम मिळत आहे. यासह 2 जीबी डेटा आणि नॉन जिओ युजर्संना 249 मिनिट्स फ्री दिले जात आहेत. यातही अनलिमिटेड व्हॅलिटीडी मिळत आहे.
Jio चा 50 रुपयांचा प्लॅनः यात युजर्संना 39.37 रुपयांचा टॉकटाईम मिळेल. तसंच 5 जीबी डेटा आणि नॉन जिओ युजर्संना कॉलिंगसाठी 656 मिनिट्स फ्री दिले जात आहेत. या प्लॅनचीही व्हॅलिटीडी अनलिमिटेड आहे.
Airtel चा 19 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये युजरला 2 दिवसांची व्हॅलिटीडी मिळते. यात 2 दिवसात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. हाा एक स्पेशल कॉम्बो रिचार्ज असून यात 200 MB फ्री डेटा मिळेल.
Airtelचा 48 रुपयांचा प्लॅन: या युजर्सला 28 दिवसांची व्हॅलिटीडी मिळेल. यासोबत 38.52 रुपयांचा टॉकटाईम मिळेल. तसंच 100MB फ्री डेटा देखील मिळेल.
Vodafone चा 19 रुपयांचा प्लॅनः या प्लॅनमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर 2 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. तसंच 200 MB फ्री डेटा देखील मिळेल. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये युजर्संना दोन दिवसासाठी वोडाफोन प्ले आणि ZEE5 चं सबस्क्रिप्शनही दिलं जात आहे.
तर तुमच्यासाठी सुटेबल असलेल्या प्लॅनची लगेचच निवड करा आणि कंपनीकडून देण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्या. कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण घरुन काम करत आहेत. त्यांच्यासाठी जिओने वर्क फ्रॉम होमचा प्लॅन सुरु केला होता. तर BSNL ने देखील वर्क फ्रॉम होम लॉन्च करत युजर्संना खुश केले होते.