Redmi Note 9 Sale: आज दुपारी 12 पासून Amazon.in आणि Mi.com वर सेलला सुरुवात; पहा किंमत आणि ऑफर्स
यापूर्वी देखील रेडमी नोट 9 चा अनेकदा ऑनलाईन सेल झाला होता. आता पुन्हा एकदा रेडमी नोट 9 चा सेल युजर्संच्या भेटीला आला आहे.
रेडमी नोट 9 (Redmi Note 9) चा सेल आजपासून सुरु होत आहे. यापूर्वी देखील रेडमी नोट 9 चा अनेकदा ऑनलाईन सेल झाला होता. आता पुन्हा एकदा रेडमी नोट 9 चा सेल युजर्संच्या भेटीला आला आहे. आज दुपारी 12 पासून अॅमेझॉन इंडिया आणि शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर हा सेल सुरु होईल. एचडीएफसी बँक कॅशबॅक कार्डवरुन (HSBC Bank Cashback Cards) खरेदी केल्यास 5% डिस्काऊंट मिळेल. तर अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर (Amazon Pay ICICI Bank Credit Cards) 5% ची सूट मिळेल. यावर नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) आणि स्डॅडर्ट ईएमआयचा (Standard EMI) पर्याय देखील उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा FHD+ punch-hole डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 2340x1080 पिक्सल इतके आहे. यात MediaTek Helio G85 SoC हा प्रोसेसर दिला असून 6GB रॅम आओणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.
प्रोसेसर | MediaTek Helio G85 SoC |
रॅम | 4GB, 6GB |
इंटरनल स्टोरेज (मेमरी) | 64GB, 128GB |
बॅटरी | 5,020mAh |
बॅक कॅमेरा | 48MP, 8MP, 2MP, 2MP |
सेल्फी कॅमेरा | 13MP |
चार्जिंग सपोर्ट | 22W फास्ट चार्गिंग सपोर्ट |
Redmi India Tweet:
फोटोग्रॉफीसाठी यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा व्हाईल्ड एन्गल लेन्स, 2MP चा मायक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी असून 22W चा फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोन Aqua Green, Pebble Grey, Scarlet Red आणि Arctic White या चार शेड्समध्ये उपलब्ध आहे.
यामध्ये कनेक्टीव्हीटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi 802.11 a/b/g/n, Bluetooth v5.0, GPS/A-GPS, 3.5mm headphone jack आणि रिअर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी नोट 9 च्या 4GB आणि 64GB वेरिएंटची किंमत 11.999 रुपये आहे. तर 4GB आणि 128GB, 6GB आणि 128GB वेरिएंटची किंमत अनुक्रमे 13.499 आणि 14,999 रुपये इतकी आहे.