Redmi Note 9 Pro Max चा आज दुपारी 12 पासून Amazon.in आणि Mi.com वर सेल; जाणून घ्या स्पेसिफिकेशन, किंमत आणि ऑफर्स
रेडमी नोट 9 प्रो मॅक्स या स्मार्टफोनचा आज पुन्हा एकदा सेल आहे. अॅमेझॉन इंडिया आणि शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 12 वाजता सेलला सुरुवात होईल. हा स्मार्टफोन सह एअरटेल 4G डबल बेनिफिट्स सह विक्रीस उपलब्ध आहे.
रेडमी नोट 9 प्रो मॅक्स (Redmi Note 9 Pro Max) या स्मार्टफोनचा आज पुन्हा एकदा सेल आहे. अॅमेझॉन इंडिया (Amazon India) आणि शाओमी इंडियाच्या (Xiaomi India) अधिकृत वेबसाईटवर दुपारी 12 वाजता सेलला सुरुवात होईल. हा स्मार्टफोन एअरटेल 4G डबल बेनिफिट्स (Airtel 4G double Data Benefits) सह विक्रीस उपलब्ध आहे. यात 298 आणि 398 रुपयांचे अनलिमिटेड पॅक्स उपलब्ध आहेत. दरम्यान लॉन्च झाल्यापासून या स्मार्टफोनच्या किंमतीत दोनदा वाढ झाली आहे. त्यामुळे लॉन्चच्या वेळी असणारी किंमत आता 2000 रुपयांनी वाढली आहे.
शाओमीच्या रेडमी नोट 9 मॅक्स मध्ये 6.67 इंचाचा एफएचडी+डॉट डिस्प्ले देण्यात आला असून त्यात 2400x1080 इतके त्याचे रिजोल्यूशन आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G चिपसेट दिला आहे. तर 5,020mAh च्या बॅटरी सह 33W चा फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 64MP ची मेन लेन्स असून 8MP ची दुसरी अल्ट्रा व्हाईल्ड एंगल लेन्स आहे. तर 5MP चा मॉक्रो शूटर आणि 2 MP डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स:
प्रोसेसर | क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G |
रॅम | 6GB, 8GB |
इंटरनल स्टोरेज (मेमरी) | 64GB, 128GB |
बॅटरी | 5,020mAh |
बॅक कॅमेरा | 64MP, 8MP, 5MP, 2MP |
सेल्फी कॅमेरा | 32MP |
फास्ट चार्जिंग सपोर्ट | 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट |
हा स्मार्टफोन तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 6GB रॅम+ 64GB इंटरनल स्टोरेज, 6GB रॅम+128GB इंटरनल स्टोरेज ाणि 8GB रॅम+ 128GB इंटरनल स्टोरेज या तीन वेरिएंटची किंमत अनुक्रमे 16,999 रु., 18,499 रु. आणि 19,999 रु. इतकी आहे.
वेरिएंटनुसार किंमती:
6GB रॅम+ 64GB इंटरनल स्टोरेज | 16,999 रुपये |
6GB रॅम+128GB इंटरनल स्टोरेज | 18,499 रुपये |
8GB रॅम+ 128GB इंटरनल स्टोरेज | 19,999 रुपये |
या स्मार्टफोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेन्सर असून 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लुट्युथ v5.0, Infrared, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm चा ऑडिओ हेडफोन जॅक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)