Realme X7 Pro एक्सट्रीम स्मार्टफोन लॉन्च, युजर्सला 64MP कॅमेऱ्यासह 4500mAh ची मिळणार बॅटरी

या स्मार्टफोनच्या उत्तम परफॉर्मेन्ससाठी Dimensity 1000+ प्रोसेसर दिला गेला आहे.

Realme X5 50 Pro 5G (Photo Credit: Twitter)

स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme ने आपला शानदार फोन Realme X7 Pro एक्सट्रीम अॅडिशन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या उत्तम परफॉर्मेन्ससाठी Dimensity 1000+ प्रोसेसर दिला गेला आहे. या व्यतिरिक्त युजर्सला एक्सट्रीम अॅडिशनमध्ये 64MP चा कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी मिळणार आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला गेला आहे.Realme X7 Pro एक्सट्रीम अॅडिशनमध्ये 6.55 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो फुल एचडी रिजॉल्यूशन सपोर्ट करणार आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि सॅम्पेलिंग रेट 360Hz आहे. यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. या व्यतिरिक्त युजर्सला एक्सट्रीम अॅडिशन फोनमध्ये 7nm चा Dimensity 1000+ प्रोसेसर मिळणार आहे.

कंपनीने रिअलमी एक्स 7 प्रो एक्सट्रीम अॅडिशनमध्ये ट्रीपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये पहिला 64MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि मॅक्रो लेन्स दिली गेली आहे. त्याचसोबत फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.(Xiaomi Mi 11 Ultra 'या' तारखेला भारतात होणार लाँच, हा स्मार्टफोन असणार कॅमे-याच्या बाबतीत अव्वल)

बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास 4,500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जो 65W फास्ट चार्जिंग लेस आहे. त्याचसोबत फोनमध्ये VC Liquid कूलिंग तंत्रज्ञान दिले गेले आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये युजर्सला वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स मिळणार आहेत. स्मार्टफोनमधील 8GB रॅम+ 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम+256GB स्टोरेज वेरियंट मध्ये मिळणार आहे. ज्याची किंमत क्रमश: जवळजवळ 25,672 रुपये, 29,022 रुपये आहे. हा फोन Castle स्काय आणि ब्लॅक Clever Forest कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे.