Realme X3 आणि Realme X3 SuperZoom भारतात 25 जून रोजी होणार लॉन्च; पहा काय आहेत फीचर्स

Realme X3 आणि Realme X3 SuperZoom असे हे दोन स्मार्टफोन्स आहेत.

Realme X3 & Realme X3 SuperZoom India Launch (Photo Credits: Realme India Twitter)

रियलमीचे (Realme) दोन स्मार्टफोन्स 25 जून रोजी भारतात लॉन्च होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. Realme X3 आणि Realme X3 SuperZoom असे हे दोन स्मार्टफोन्स आहेत. Realme X3 Super Zoom मध्ये 5x ऑप्टीकल झुम कॅमेरा असून 120Hz चा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात युरोपमध्ये 499 युरोज इतक्या किंमतीला लॉन्च झाला. Realme X3 Super Zoom मध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर आणि 12GB ची रॅम आहे.

रियलमीचे व्हाईस प्रेसिडेंट आणि रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ यांनी ट्विट करत सांगितले, "तुम्ही ज्या X ची वाट पाहत आहात तो आता आला आहे. आम्ही तुमच्यासाठी फक्त 60X Super Zoom आणत नसून सुपरस्पीड सह आमचे नवीन प्लॅगशीप फोन RealmeX3 आणि RealmeX3SuperZoom देखील आणत आहोत. 25 जून रोजी दुपारी 12.30 वाजता हे स्मार्टफोन लॉन्च केले जातील."

Realme Tweet:

या स्मार्टफोनमध्ये 4 रिअर कॅमेरे असून प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाईड एन्गल लेन्स, 8MP पेरिस्कोप स्टाईल लेन्स आणि 2MP मॉक्रो लेन्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये 4,200mAh ची बॅटरी असून USB Type-C पोर्टद्वारे 30W पर्यंतचा फास्ट चार्गिंग सपोर्ट करतो.

रियलमी X3 मध्ये 6.57 इंचाचा फुल एचडी डिस्ल्पे, ऑक्टा कोर प्रोसेसर असून 12GB रॅम आणि 256GB ची इंटरनल मेमरी स्टोरेज आहे. यामध्ये 4,100mAh ची बॅटरी असून 4 रिअर कॅमेरे आहेत. यापैकी प्रायमरी सेन्सर हा 48MP चा असून सेकंडरी सेन्सर 8MP चा आहे.