Realme Narzo 50A आणि Narzo 50i स्मार्टफोन्स भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
रियलमी इंडियाने नार्झो 50 सिरीज भारतात लॉन्च केली आहे. यात नार्झो 50 ए आणि नार्झो 50 आय या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. 7 ऑक्टोबर 2021 दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोन्सच्या सेलला सुरुवात होईल.
रियलमी इंडियाने (Realme India) नार्झो 50 सिरीज (Narzo 50 Series) भारतात लॉन्च केली आहे. यात नार्झो 50 ए (Narzo 50A) आणि नार्झो 50 आय (Narzo 50i) या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. 7 ऑक्टोबर 2021 दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोन्सच्या सेलला सुरुवात होईल. रियलमीच्या अधिकृत साईट Realme.com, फ्लिपकार्ट (Flipkart) आणि इतर रिटेल स्टोअरवर हे स्मार्टफोन्स खरेदीसाठी उपलब्ध असतील. (Realme Narzo 30 5G, Narzo 30, Buds Q2 आणि 32-Inch Smart TV च्या भारतातील लॉन्चिंगला सुरुवात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स)
Narzo 50i च्या 2जीबी+32जीबी वेरिएंटची किंमत 7,499 रुपये असून 4जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 8,799 रुपये इतकी आहे. तर Narzo 50A च्या 4जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 11,499 रुपये आणि 4जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 12,499 रुपये इतकी आहे.
Narzo 50i स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी मल्टी-टच डिस्प्ले देण्यात आला असून Narzo 50A मध्ये 6.5 इंचाचा मिनी ड्रॉप स्क्रीन देण्यात आली आहे. दोघांमध्येही 1600x720 पिक्सल रिजोल्यूशन देण्यात आलं आहे.
Realme Narzo 50i मध्ये 8MP चा रियल कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात Unisoc 9863 SoC चा प्रोसेसर 4जीबी रॅम आणइ 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह देण्यात आला आहे. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून त्यात 43 दिवसांचा standby time सादर करण्यात आला आहे.
Narzo 50A मध्ये MediaTek Helio G85 SoC चा प्रोसेसर 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह देण्यात आला आहे. यात ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 50MP चा Al कॅमेरा, 2MP चा पोट्रेट शूटर आणि 2MP चा मायक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6000 mAh ची बॅटरी 18W Type-C quick charging support सह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात USB Type-C port, dual-band Wi-Fi 802.11 ac, GPS, dual-SIM slots आणि Bluetooth version 5 देण्यात आलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)