खुशखबर! Realme C12 चा उद्या रात्री 8 वाजता फ्लिपकार्टवर होणार सेल, कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी लाईफ असणा-या या स्मार्टफोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये

त्याचबरोबर Flipkart Axis Bank Credit Card वरुन पेमेंट केल्यास तुम्हाला 5% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये इतकी आहे.

Realme C12 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी (Realme) आपले एकाहून एक सरस फिचर्स असणारे स्मार्टफोन भारतात लाँच करत आहे. यामुळे रियलमी ने भारतीय बाजारात स्वत:चा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. रियलमीचा मागील महिन्यात भारतात लाँच झालेल्या Realme C12 या स्मार्टफोनचा उद्या म्हणजेच 14 सप्टेंबरला ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) सेल होणार आहे. विशेष म्हणजे हा सेल उद्या रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे ज्यांना मागील सेल मध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता आला नाही त्यांच्यासाठी उदया चांगलीच संधी असणार आहे.

जबरदस्त बॅटरी लाईफ असणारा Realme C12 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर नो कॉस्ट EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर Flipkart Axis Bank Credit Card वरुन पेमेंट केल्यास तुम्हाला 5% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये इतकी आहे.

हेदेखील वाचा- क्वाड रियर कॅमेऱ्यासह Realme 7 Pro भारतात लॉन्च, जाणुन घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर यात 6.52 इंचाची HD+डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात Mediatek Helio G35 प्रोसेसर सुद्धा देण्यात आले आहे. याच्या स्टोरेजविषयी सांगायचे झाले तर यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आले आहे.

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात 13MP+2MP+2MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनमध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6000mAh ची Lithium-ion बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये Wifi, ब्लूटुथ V5.0, GPS, GLonass आणि 35mm हेडफोन जॅक देण्यात आले आहे.

दरम्यान उद्या फ्लिपकार्टर दुपारी 12 वाजता Realme 7 Pro देखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB+128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB+128GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मिरर ब्लू आणि मिरर व्हाइट रंगाच्या वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्यांदाच 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. युजर्सला याच्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईट्ससह ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart येथून खरेदी करु शकतात.