लॉकडाउनच्या काळात Realme ची मोठी घोषणा; फोनसह सर्व डिव्हाइसेसचा Warranty व Replacement कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर

या काळात अनेक कंपन्यांनी ग्राहकपयोगी निर्णय घेतले आहेत. आता ओप्पोच्या सब-ब्रँड रियलमीने (Realme) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे.

Realme Phones (File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे भारतात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली गेली आहे. या काळात अनेक कंपन्यांनी ग्राहकपयोगी निर्णय घेतले आहेत. आता ओप्पोच्या सब-ब्रँड रियलमीने (Realme) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. रियलमीने जाहीर केले आहे की, कंपनीने आपल्या सर्व उत्पादनांवर वारंटी कालावधी (Warranty Period) 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रियलमी स्मार्टफोनसह इतर अनेक उत्पादनांसाठी हा वाढलेला वारंटी कालावधी लागू होईल. ज्या ग्राहकांच्या रियलमी उत्पादनांची वारंटी मार्च 20 ते 20 एप्रिल मध्ये आहे, असेच ग्राहक याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

तसेच कंपनीने सांगितले आहे की, 15 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान खरेदी केलेल्या उत्पादनांसाठी बदलीचा कालावधी (Replacement Period) 30 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. भारत सरकारने नुकतेच 21 दिवसांसाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भारतातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. ही परिस्थितीत लक्षात घेऊन रियलमीने आपल्या उत्पादनांची निर्मिती तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ म्हणाले की, ‘आम्ही कठीण काळात आमच्या ग्राहकांना पाठबळ देण्यासाठी ही पावले उचलली आहेत. कोरोना व्हायरसमुळे, रियलमीने आपल्या नवीन Realme Narzo मालिकेचा प्रक्षेपण कार्यक्रमही काही काळासाठी पुढे ढकलला आहे.' Realme Narzo 10 आणि Realme Narzo 10 ए स्मार्टफोन रिअलमीच्या नवीन नारजो मालिकेअंतर्गत लाँच केले जाणार होते. (हेही वाचा: Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर फ्लिपकार्टने बंद केल्या सर्व सर्विस, युजर्सला दिला 'हा' सल्ला)

यासोबतच चीनी टेक ब्रँड हुआवेने (Huawei) ही म्हटले आहे की, कंपनीच्या सर्व उत्पादनांची (स्मार्टफोन, स्मार्टवॉच, हेडसेट, चार्जर्स आणि इतर डिव्हाइस) वॉरंटी 30 जून, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा लाभ असे ग्राहक घेऊ शकणार आहेत, ज्यांच्या डिव्हाइसची वारंटी 21 मार्च ते 21 जून 2020 पर्यंत संपणार आहे.