Realme 5s सह 'या' 2 स्मार्टफोन्सच्या किंमतीत झाली वाढ, GST मध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीने घेतला निर्णय
GST मध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोन्सच्या किंमतीत जवळपास 1000 रुपयांची वाढ केली आहे.
सध्याच्या जगात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अशातच बाजारात एकाहून एक सरस स्मार्टफोन्सची स्पर्धा सुरु आहे. बाजारात स्मार्टफोन्सचे अनेक ब्रँड आलेले आहेत. त्यातीलच Realme या स्मार्टफोन निर्माता कपंनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपल्या Realme 5s, Realme c2 आणि Realme 6 या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. GST मध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोन्सच्या किंमतीत जवळपास 1000 रुपयांची वाढ केली आहे.
नवीन किंमतीनुसार, Realme 5s च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 10,999 रुपयांवरून 11,999 रुपये इतकी झाली आहे. तसेच 4GB रॅम आण 128GB स्टोरेज वेरियंटी किंमत 12,999 रुपये इतकी झाली आहे. WhatsApp वरील डिलिट झालेले फोटो पुन्हा डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स
त्याचबरोबर Realme 6 स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ची किंमत 14,999 रुपये इतकी झाली आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत क्रमश: 16,999 रुपये आणि 17,999 रुपये इतकी झाली आहे.
तसेच Realme c2 च्या 2GB रॅम आणि 16GB स्टोरेजची किंमत 6,999 रुपये इतकी झाली आहे. तर याच्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजची किंमत अनुक्रमे 7,499 रुपये आणि 7,999 रुपये रुपये इतकी झाली आहे.