Ranveer Allahbadia's YouTube Channels Hacked: रणवीर अल्लाहबादिया चे सारे पॉडकास्ट डिलीट; Beer Bicep चं नाव बदलून Tesla
‘BeerBiceps’ आणि ‘The Ranveer Show’या दोन्ही अकाऊंटवर सायबर हल्ला झाल्याने त्याची नावं बदलून 'Tesla' कारण्यात आली आहेत.
प्रसिद्ध भारतीय युट्युबर रणवीर अल्लाहबादिया (Ranveer Allhabadia) वर सायबर अटॅक झाला आहे. त्याची दोन्ही युट्युब चॅनेल्स हॅक झाली असून सारे पॉडकास्ट डिलीट करण्यात आले आहेत. Ranveer Allhabadia हे त्याचं स्वतःचं चॅनेल आणि BeerBiceps या दोन्ही अकाऊंटची नावं बदलली आहे. ती बदलून Tesla करण्यात आल्याचं दिसत आहे. सोशल मीडीया युजर्सनी त्याचे स्क्रीन शॉर्ट्स देखील शेअर केले आहेत.
दरम्यान रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम वर स्टोरी पोस्ट करत या हॅक प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. 'हा माझ्या युट्युब करियरचा शेवट आहे का?' असा सवाल त्याने विचारला आहे.
रणवीरने 22 व्या वर्षी पहिलं युट्युब चॅनेल सुरू केलं होतं. त्याची 7 युट्युब चॅनेल्स आहेत. त्याच्या युट्युब चॅनेल्स वर 12 मिलियनच्या आसपास फॉलोवर्स आहेत.
Ranveer Allhabadia ची प्रतिक्रिया
सोशल मीडीयात युजर्सच्या प्रतिक्रिया
रणवीरने 22 व्या वर्षी पहिलं युट्युब चॅनेल सुरू केलं होतं. त्याची 7 युट्युब चॅनेल्स आहेत. त्याच्या युट्युब चॅनेल्स वर 12 मिलियनच्या आसपास फॉलोवर्स आहेत. रणवीरने त्याच्या युट्युब करियरची सुरूवार स्वतःचा फीटनेसचा प्रवास डॉक्युमेंट करत केली. पदवीधर झाल्यानंतर त्याने BeerBiceps सुरू केलं. त्यामध्येही फीटनेस आणि कुकिंग वर त्याचे व्हिडिओ होते. हळू हळू जसं चॅनेल मोठं झालं तसा तो मेन्स फॅशन, ग्रुमिंग कडे , मेंटल हेल्थ वर वळला. मागील काही महिन्यात त्याने अनेक सेलिब्रिटींसोबत पॉडकास्ट केले होते. 2021 मध्ये तो पहिला independent creator होता ज्याने Spotify सोबत पार्टानर झाला आणि तेथे त्याचा शो हा प्लॅटफॉर्मचा टॉप पॉडकास्ट होता.