PUBG Korean Version In India: भारतामध्ये खेळू शकता पबजी गेमची कोरियन आवृत्ती, जाणून घ्या हे अॅप डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
काल भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत तब्बल 108 चीनच्या अॅप्सवर बंदी घातली. यामध्ये एक लोकप्रिय गेम पबजी (PUBG) चाही समावेश आहे. हा गेम भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जायचा. जेव्हापासून पबजी मोबाइलला भारतीय सर्व्हरवर बंदी घातली गेली आहे,
काल भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत तब्बल 108 चीनच्या अॅप्सवर बंदी घातली. यामध्ये एक लोकप्रिय गेम पबजी (PUBG) चाही समावेश आहे. हा गेम भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जायचा. जेव्हापासून पबजी मोबाइलला भारतीय सर्व्हरवर बंदी घातली गेली आहे, तेव्हापासून हा गेम खेळणारे गेमर पबजी खेळण्यासाठी दुसरा मार्ग शोधत आहेत. आपल्या फोनवर डाउनलोड केल्या जाऊ शकणार्या पबजी मोबाइलच्या इतर अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. यातील सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे पबजी मोबाइल कोरियन आवृत्ती (PUBG Mobile Korean Version) वापरणे.
या आवृतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर आता हा गेम खेळणारे लोक त्याबद्दल तपशील विचारत आहेत. म्हणूनच आज आम्ही पबजी मोबाइलच्या कोरियन आवृत्तीबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.
तर, खेळाडू कोरियन पबजी मोबाइल अॅप शोधत आहेत, पण प्रश्न आहे की तो भारतमध्ये खेळला जाऊ शकतो? तर सर्वसामान्यपणे हे अॅप भारतामध्ये कार्य करणे अपेक्षित आहे व यावर तुम्हाला एक्सेस मिळू शकतो. परंतु आपल्या प्लेअरची माहिती किंवा आकडेवारी मिळू शकेल यात शंका आहे, कारण भारतीय पबजी मोबाइल चीनी सर्व्हरवर तयार केला गेला होता. आता मूळ कोरियन कंपनीने देखील तयार केलेली पबजी पीसी आवृत्ती वापरुन लोक हा खेळ खेळू शकतात. (हेही वाचा: सरकारकडून पबजी गेमवर बंदी घातल्याने Twitterati वर पालकांनी व्यक्त केला आनंद तर युजर्सच्या चेहऱ्यावरील नाराजी दाखवणारे मजेशीर मेम्स व्हायरल)
जाणून घ्या कसे डाऊनलोड कराल पबजी गेमची कोरियन आवृत्ती –
- अॅप स्टोअर वरून टॅपटॅप अॅप (TapTap App) डाउनलोड करा.
- हे अॅप इन्स्टॉल करा
- त्यानंतर टॅपटॅप अॅपवर पीयूबीजी मोबाइल केआर (PUBG Mobile KR) शोधा आणि इन्स्टॉलवर क्लिक करा
- त्यानंतर हे डाउनलोड सुरू होईल.
- इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अॅप सुरु होईल.
अशा प्रकारे, हा खेळ एन्जॉय करणाऱ्या सर्व बीआर प्रेमी (BR Lovers) आणि गेमरसाठी पबजी कोरियन मोबाइल अॅप डाउनलोड करणे निश्चितच आवश्यक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)