Poco M2 Pro India Launch Set For Tomorrow: पोको एम 2 प्रो उद्या भारतात होणार लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून
ज्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांनाही मोठे फटका बसल आहे. मात्र, देशात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या काही निर्बधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोना विषाणूमुळे वाढत्या प्रादुर्भावाचा उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टीवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांनाही मोठे फटका बसल आहे. मात्र, देशात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या काही निर्बधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येत आहेत. यातच पोको कंपनीचा नवीन स्मार्टफोन पोको एम2 प्रो (Poco M2 Pro) उद्या भारतात लॉन्च होणार आहे. पोको कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी पोको एम 2 प्रो स्मार्टफोनबाबत चर्चा केली होती. तसेच हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी पंसती मिळवेल, असा विश्वासही कंपनीने त्यावेळी व्यक्त केला होता. यामुळे पोको एम 2 स्मार्टफोन कधी बाजारात दाखल होणार? याकडे संपूर्ण स्मार्टफोन चाहत्यांचे लक्ष लागले होते.
भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन कंपनीने आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय बाजारात शाओमी, ओपो, यांसारख्या अनेक कंपन्यांना अधिक मागणी आहे. परंतु, लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यात झालेल्या संघर्षामुळे भारतात अनेक चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीने जोर धरला आहे. परिणामी, चीनी स्मार्टफोनच्या विक्रित घट झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, पोको कंपनीचा पोको एम 2 प्रो बाजारात दाखल झाल्यानंतर चाहत्यांना आकर्षित करेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. हे देखील वाचा- ShareIt सारखे नवे अॅप Google लवकरच घेऊन येणार, स्मार्टफोन्सना फाइल शेअरिंगसाठी मिळणार दमदार ऑप्शन
ट्वीट-
पोको एम2 प्रो स्मार्टफोनमध्ये धमदार बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. रेडमी नोट 9 आणि रेडमी 10 एक्स या स्मार्टफोनसारख्या वैशिष्टांचा यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आल्याचे समजत आहे. या स्मार्टफोनची किंमत 30 हजारांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.