Poco M2 Pro First Sale Today: आज दुपारी 12 पासून Flipkart वर सेलला सुरुवात; जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि ऑफर्स

आज या स्मार्टफोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे.

Poco M2 Pro India Sale (Photo Credits: Flipkart)

पोको (Poco) या चायनीज मोबाईल ब्रँड कंपनीने Poco M2 Pro हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात लॉन्च केला होता. आज या स्मार्टफोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) हा मोबाईल विकत घेणाऱ्या युजर्संना 3000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. तसंच या मोबाईलवर अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Axis Bank Credit Cards) किंवा अॅक्सिस बँक बझ क्रेटिड कार्ड (Axis Bank Buzz Credit Cards) वापरल्यास 5% अधिक डिस्काऊंट देण्यात येणार आहे. तसंच हा मोबाईल विकत घेण्यासाठी युजर्स नो कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) किंवा स्टँडर्ड ईएमआयचा (Standard EMI) पर्याय निवडू शकतात.

Poco M2 Pro मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला असून स्क्रिनवर corning gorilla glass देण्यात आली आहे. तसंच या मोबाईलमध्ये 2400x1080 पिक्सलचा स्क्रिन रिजोल्यूशन असून 20:9 चा सिनेमॅक्टीक आस्पेक्ट रेशो देण्यात आला आहे.

प्रोसेसर Qualcomm Snapdragon 765G
रॅम 4GB / 6GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 64GB / 128GB
बॅटरी 5,000mAh
बॅक कॅमेरा 48MP, 8MP, 5MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 16MP
फास्ट चार्जिंग सपोर्ट 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट

POCO For India Tweet:

या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्पॅनड्रगन 765G प्रोसेसर असून Adreno 618 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तीन शेड्समध्ये उपलब्ध आहे- ब्लॅक, ब्लु आणि ग्रीन या शेड्समध्ये उपलब्ध आहे. हा मोबाईलमध्ये कॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 48MP चा मेन कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा व्हाईड अॅगल लेन्स, 5MP ची मॉक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

Poco M2 Pro हा तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध असून  4GB रॅम+64GB मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 13,999  इतकी आहे. तर 6GB रॅम+ 64GB मेमरी असलेल्या वेरिएंटची किंमत 14,999 इतकी आहे. तर 6GB आणि 128GB असलेल्या वेरिएंटची किंमत 16,999 इतकी आहे.