Philips कंपनीने भारतात लाँच केले 10 स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या त्यांची किंमत आणि खास वैशिष्ट्ये
तर 7600 आणि 6800 सीरिजमध्ये कस्टमाइज्ड SAPHI OS सह लाँच केले आहेत.
फिलिप्स (Philips) कंपनीने भारतात आपले 10 स्मार्ट टिव्ही (Smart TV) लाँच केले आहे. या स्मार्टटिव्हीमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. फिलिप्स चार नवे स्मार्ट टीव्ही सीरिज लाँच केली आहे. त्यात Philips Smart TV Range 2021 मध्ये कंपनीने 8200, 7600, 6900 आणि 6800 सीरीज लाँच केली आहे. त्यात 8200 आणि 6900 सीरिज मध्ये Android TV सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. तर 7600 आणि 6800 सीरिजमध्ये कस्टमाइज्ड SAPHI OS सह लाँच केले आहेत.
Philips Android Smart TV Range मध्ये Google Assistant व्हॉइस सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर Amazon Prime Video, Netflix, Youtube सारखे प्री-इन्स्टॉल्ड OTT अॅप्स मिळत आहे.हेदेखील वाचा- तब्बल 7 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo कंपनीचा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन!
Philips Smart TV च्या 8200 सीरिजमध्ये 70PUT8215 (70 इंच), 65PUT8215 (65 इंच), 55PUT8215 (55 इंच) आणि 50PUT8215 (50इंच) सह येतात. याची किंमत क्रमश: 1,49,000 रुपये, 1,19,990 रुपये, 89,90 रुपये आणि 79,990 रुपये आहे.
तर 7600 सीरीजमध्ये 58 इंच आणि 50 इंचाचे दोन टिव्ही आहेत. ज्यांची किंमत 89,990 आणि 69,990 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर 6800 सीरीजमध्ये 43 इंचाचा टिव्ही आणि 32 इंचाचा टिव्ही देण्यात आला आहे. ज्याची किंमत क्रमश: 35,990 रुपये आणि 21,990 रुपये आहे. हे स्मार्टटिव्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध करण्यात आले आहेत.
या स्मार्ट टीव्ही सीरिजमध्ये 4K UHD डिस्प्ले पॅनल दिला आहे. या सीरिजमध्ये SAPHI OS मिळतो, जो Amazon Prime Video, Netflix आणि Youtube प्री इंस्टॉल्ड OTTसह येतो.
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शिन्को इंडियाने (Shinco India) आपला नवा स्मार्टटिव्ही (Smart TV) नुकताच भारतात लाँच केला. या स्मार्टटिव्हीचे स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे हा यात Alexa देखील बिल्ट इन करण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्ट टिव्ही अलेक्सा प्रमाणे आपले ऑर्डर्स फॉलो करेल. या स्मार्टटिव्ही दोन साइजमध्ये लाँच करण्यात आला आहे. एक म्हणजे 32 इंच आणि दुसरा 43 इंच. त्यामुळे या स्मार्टटिव्हीची उत्सुकता भारतीय ग्राहकांमध्ये देखील वाढली आहे.