Oppo A53s 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लाँच, कंपनीने ट्विटद्वारे केली अधिकृत घोषणा

ओप्पो कंपनीने एक टीज केले आहे, ज्यात त्यांनी Oppo A53s 5G हा 27 एप्रिलला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर लाँच केला जाईल.

Oppo A53s 5G (Photo Credits: Twitter/Oppo India)

Oppo कंपनीचा बहुप्रतिक्षित A53s 5G स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर याच्या लाँचिंग डेटची घोषणा केली आहे. येत्या 27 एप्रिलला हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार अशी कंपनीने घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) 27 एप्रिलला दुपारी 12 वाजता लाँच होईल. या स्मार्टफोनमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये असू शकतात. सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

ओप्पो कंपनीने एक टीज केले आहे, ज्यात त्यांनी Oppo A53s 5G हा 27 एप्रिलला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर लाँच केला जाईल. Flipkart वर याची डेडिकेटेड मायक्रोसाइट लाइव करण्यात आली आहे.हेदेखील वाचा-Amazon Summer Offers अंतर्गत 'या' ब्रँडच्या एसी, फ्रीज, फॅन्स, कुलर्स वर मिळवा 50% पर्यंत सूट

कंपनीच्या टीजनुसार, Oppo A53s 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह येईल. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनर फोनच्या बाजूला असेल. रिपोर्टनुसार, यात 6GB आणि 8GB रॅम असे पर्याय मिळू शकतील. ज्याजे स्टोरेज तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. तसेच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपर रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. हा कॅमेरा मॉड्यूल रेक्टँग्युलर शेपमध्ये असेल. या व्यतिरिक्त या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी आणखी काही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी Oppo A74 5G भारतात लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनमध्ये यात 6.5 इंचाची FHD+ डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिजोल्युशल हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याचबरोबर यात अमोल्ड डिस्प्ले असू शकते. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर वापरण्यात आले आहे. Oppo A74 5G च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा रियर कॅमेरा असेल. तर 2MP चे दोन कॅमेरे मिळतील. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8MP चा कॅमेरा मिळेल.

यात या स्मार्टफोनच्या बॅटरी विषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये ड्युल बँड 5G नेटवर्क सपोर्ट दिले गेले आहेत. हा फोन ड्युल सिम कार्डला सपोर्ट करेल.