Online Shopping: माहितीचा ओव्हरलोड आणि जाहिरातींच्या भडिमारामुळे 88% भारतीयांची ऑनलाइन खरेदीला नापसंती; अहवालातून सत्य समोर
त्यामुळे 88 टक्के भारतीय ग्राहक ऑनलाइन खरेदी टाळत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. एका अहवालात असे म्हटले गेले आहे.
Online Shopping: माहितीचा ओव्हरलोड आणि जाहिरातींचा भडिमार यामुळे सुमारे 88 टक्के भारतीय ग्राहक ऑनलाइन खरेदी(Online Shopping) करने टाळतात, असे एका अहवालातून सोमर आले आहे. जागतिक आयटी सेवा फर्म Accenture च्या मते, 67 टक्के भारतीयांना ऑनलाइन खरेदीत कोणतीही सुधारणा दिसत नाही किंवा खरेदीचा निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लागतो. मेहनतही वाढलेली दिसते. "कंपन्यांनी उत्पादने आणि सेवांचे ब्रँडींग आणि मार्केटिंग कसे केले जाते यावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे, ज्यामुळे खरेदीदारांना आवाजातून नेव्हिगेट करणे आणि खरेदीदरम्यान आत्मविश्वासाने निर्णय घेणे सोपे होईल," असे एक्सेंचर कंपनीचे एमडी आणि लीड स्ट्रॅटेजी, विनीत आर आहुजा यांनी म्हटले आहे. (हेही वाचा:Japan : जन्मदर वाढवण्यासाठी टोकियो प्रशासन डेटिंग ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून )
अहवालात भारतासह 12 देशांतील 19,000 ग्राहकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, अहवालात असे म्हटले आहे की जनरेटिव्ह एआय, इतर तंत्रज्ञान आणि काम करण्याच्या नवीन पद्धतींद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण लोक ब्रँडबद्दल कसे विचार करतात हे बदलेल. "एकंदरीत, किरकोळ आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये जनरेटिव्ह एआय आणि एआय-संचालित सल्लागारांचा वापर कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, चांगला अनुभव देण्यास आणि व्यवसाय वाढीस चालना देण्यास सक्षम करू शकतो," अमनीत सिंग, एमडी आणि लीड - उत्पादने, एक्सेंचर म्हणाले.
पुढे, अहवालात असे आढळून आले की 10 पैकी 8 (79 टक्के) भारतीय ग्राहकांना खरेदीचा काही भाग मजेदार किंवा रोमांचक वाटतो. तर 74 टक्के ग्राहकांना ऑनलाईन खरेदी दरम्यान निराश वाटते आणि ते खरेदी करू इच्छित असलेल्या उत्पादनांचा स्टॉक संपलेला असतो अस दाखवले जाते.