OnePlus Smartwatch: वनप्लसचे Harry Potter Limited Edition वॉच भारतात लॉन्च; पहा काय आहे किंमत आणि फीचर्स

वनप्लसने भारतात हॅरी पॉटर लिमिटेड एडिशन वॉच लॉन्च केले आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या सहकार्याने या स्मार्टवॉचची मर्यादित आवृत्ती लाँच करण्यात आली आहे.

OnePlus Harry Potter Limited Edition Watch (Photo Credits: Twitter)

वनप्लसने (OnePlus) भारतात हॅरी पॉटर लिमिटेड एडिशन वॉच (Harry Potter Limited Edition Watch) लॉन्च केले आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या (Warner Bros) सहकार्याने या स्मार्टवॉचची मर्यादित आवृत्ती लान्च करण्यात आली आहे. या स्मार्टवॉचमधील वॉच फेसेस हॅरी पॉटरच्या दुनियेशी प्रेरित आहेत. युजर्स त्यांच्या आवडीच्या हॉगवर्ट्स (Hogwarts) घराच्या आधारावर घड्याळाचा UI बदलू शकतात यासाठी यूजर ग्रिफिंडर (Gryffindor), हफलपफ (Hufflepuff), स्लीथरिन  (Slytherin) किंवा रॅवेनक्लॉ (Ravenclaw) चा पर्याय निवडू शकतात.

वनप्लस हॅरी पॉटर लिमिटेड एडिशन वॉचची भारतात किंमत 16,999 रुपये आहे. हे 21 ऑक्टोबर रोजी 12 वाजता वनप्लस.इन (OnePlus.in), वनप्लस स्टोअर अॅप (OnePlus Store App), रेड केबल क्लब अॅप (Red Cable Club app) आणि ऑफलाइन वनप्लस स्टोअर्सवर (Offline OnePlus Stores) खरेदीसाठी उपलब्ध असेल. हे स्मार्टवॉच खरेदी करताना आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि कोटक बँक (Kotak Card) कार्ड्सवर 1,000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. कंपनी 20 ऑक्टोबर रोजी वनप्लस स्टोअर अॅपवर 12 वाजता विक्री देखील आयोजित करणार आहे.

OnePlus India Tweet:

वनप्लस हॅरी पॉटर लिमिटेड एडिशन वॉचमध्ये 1.39 इंच एचडी एमोलेड डिस्प्ले 454 × 454 पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशनसह दिला आहे. यामध्ये 110 पेक्षा जास्त वर्कआउट मोड, SpO2 मॉनिटरिंग, स्ट्रेस डिटेक्शन, ब्रिदिंग, हार्ट रेट अॅलर्ट्स यांसारखे अनेक आरोग्य-केंद्रित फीचर्स देण्यात आले आहेत. (Oneplus Buds Z2: वनप्लसचे Buds Z2 ऑक्टोंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत)

स्टँडर्ड वनप्लस वॉच प्रमाणेच हॅरी पॉटर लिमिटेड एडिशन वॉचमध्ये ब्लूटूथ, जीपीएस, आयपी 68 रेटिंग, 5 ATM वॉटर रेझिस्टन्स ही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये 402mAh ची बॅटरीसह वॉर्प चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट सुद्धा दिला आहे. 20 मिनिटे चार्ज केल्यावर हे वॉच आठवडाभर चालते आणि 5 फक्त मिनिटे चार्ज केल्यावर दिवसभर चालते, असा दावा कंपनीने केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now