OnePlus Nord 2, Galaxy A22 5G सह 'हे' शानदार स्मार्टफोन जून मध्ये होणार लॉन्च
लीक रिपोर्ट्सनुसार, जून महिन्यात OnePlus Nord 2 भारतात लॉन्च केला जाणार आहे.
येत्या जून महिन्यात काही दमदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. लीक रिपोर्ट्सनुसार, जून महिन्यात OnePlus Nord 2 भारतात लॉन्च केला जाणार आहे. त्याचसोबत चीनी स्मार्टफोन कंपनी POCO M3 Pro स्मार्टफोन सुद्धा पुढील महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचसोबत साउथ कोरियाची कंपनी Samsung दोन नवे धमाकेदार स्मार्टफोन Galaxy M32 आणि Galaxy A22 5G स्मार्टफोन लवकरच लॉन्च केले जाऊ शकतात.(Jio सोबत Google लवकरत लॉन्च करणार परवडणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार अत्यंत स्वस्तात इंटरनेट डेटा)
POCO M3 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 16 हजार रुपये असू शकते. तर स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. फोन 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्लेसह येणार आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यामध्ये पहिला 48MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 2MP ची मॅक्रो लेन्स आणि तिसरा 2MP चा डेप्थ सेंसर दिला जाणार आहे. तर फोनच्या फ्रंटला 8MP चा कॅमेरा मिळणार आहे.
तसेच अपकमिंग OnePlus Nord CE 5G स्मार्टफोनचे डिझाइन OnePlus Nord N10 5G सारखेच असणार आहे. यामध्ये एक साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाणार आहे. तर फोटोग्राफीसाठी एक ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये एक USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅकचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. लीक रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord CE हा OnePlus Nord च्या तुलनेत कमी किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. ही किंमत 64GB स्टोरेज वेरियंटची असू शकणार आहे.
Samsung Galaxy M32 ची 17 हजार रुपये किंमत असण्याची शक्यता आहे. यामध्ये MediaTek Helio G60 प्रोसेसर दिला जाणार आहे. या स्मार्टफोनसाठी 64GB रॅम आणि एचडी डिस्प्ले दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. हे डिवाइस अॅन्ड्रॉइड 11 आधारित One UI आउट ऑफ द बॉक्सवर काम करणार आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती देण्यात आलेली नाही.(1 जून पासून बदलणार नियम, Google आणि YouTube च्या 'या' सर्विससाठी द्यावे लागणार शुल्क)
त्याचसोबत Samsung Galaxy A22 5G हा स्मार्टफोन सुद्धा जून मध्ये लॉन्च होणार आहे. यामध्ये 5G सह 4G वर्जनमध्ये उतरवला जाऊ शकतो. स्मार्टफोन दोन वेरियंट विविध स्पेसिफिकेशन मध्ये उपलब्ध होणार आहे. फोनच्या 5G मॉडेलमध्ये 6.4 इंचाची LCD स्क्रिन दिली जाऊ शकते. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा सुद्धा युजर्सला मिळणार आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असणार आहे. डेप्थ सेंसर आणि मॅक्रो लेन्सचा सपोर्ट मिळणार आहे. MediaTek Dimensity 700 चिपसेटचा वापर यामध्ये केला जाणार आहे. स्मार्टफोनच्या दोन्ही मॉडेलमध्ये पॉवरबॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे.