OnePlus Faces Sales Ban: येत्या 1 मे पासून विकले जाणार नाहीत वनप्लसचे फोन्स; बाजारातील विक्री होणार बंद, रिटेलर्सने दिला इशारा

आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 मोबाईल रिटेल चेन आहेत, ज्यांचे 4,500 स्टोअर 1 मे पासून वनप्लस फोनची विक्री थांबवू शकतात.

OnePlus Faces Sales Ban: वनप्लस (OnePlus) गॅझेट्स भारतात लोकप्रिय आहेत, परंतु देशातील रिटेल स्टोअरमध्ये त्यांची विक्री येत्या काही दिवसांत बंद केली जाऊ शकते. साउथ इंडियन ऑर्गनाइज्ड रिटेलर्स असोसिएशन (ORA) ने सांगितले आहे की, ते 1 मे 2024 पासून आपल्या किरकोळ विक्रेत्यांच्या नेटवर्कवर वनप्लस मोबाइल डिव्हाइसची विक्री थांबवतील. म्हणजेच वनप्लस डिव्हाइसेस रिटेल स्टोअरमध्ये विकले जाणार नाहीत. याचा परिणाम देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात असलेल्या स्टोअरवर होईल.

रिटेल स्टोअर्समध्ये वनप्लस डिव्हाईसची विक्री न करण्याचे कारण या चिनी ब्रँडसोबत सुरू असलेल्या विविध समस्या आणि कंपनीसोबतचा कथित न सुटलेला वाद हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

वृत्तानुसार, दक्षिण भारतीय मोबाइल रिटेलर्स असोसिएशनने वनप्लस इंडियाचे विक्री संचालक रणजीत सिंग यांना पत्र लिहून सांगितले आहे की, ते वनप्लससोबत अनेक समस्यांचा सामना करत आहेत त्यामुळे त्यांनी रिटेल स्टोअरमध्ये वनप्लस डिव्हाइसेस विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीसोबत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असूनही त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने हे कठोर पाऊल उचलण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे असोसिएशनने म्हटले आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 मोबाईल रिटेल चेन आहेत, ज्यांचे 4,500 स्टोअर 1 मे पासून वनप्लस फोनची विक्री थांबवू शकतात. दुकानदारांचे म्हणणे आहे की वनप्लससोबत असलेल्या या समस्यांमध्ये कमी फायदा, वॉरंटी आणि सेवेमध्ये विलंब तसेच इतर वस्तू विकण्याचा दबाव यांचा समावेश होतो. दुकानदारांचे म्हणणे आहे की, वनप्लस जबरदस्तीने त्यांना त्यांच्या फोनसह इतर गोष्टी विकण्यास सांगतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. (हेही वाचा: BoAt Security Breach : गॅजेट कंपनी BoAt च्या 75 लाख ग्राहकांचा डेटा लीक; नाव, पत्ता, फोन नंबरसह ई-मेल आयडीचा समावेश)

एखाद्या ग्राहकाचा फोन खराब झाला आणि त्याने वॉरंटी किंवा सर्व्हिस क्लेम केल्यास तो दुरुस्त होण्यास बराच विलंब होतो, तसेच अनेक वेळा फोन नीट ठीकही केला जात नाही, अशा अनेक समस्यांना दुकानदारांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत दुकानदारांनी वनप्लसला अनेकवेळा सांगितले पण उपयोग झाला नाही. वनप्लसला भारतात आपले दुकान (ऑफलाईन स्टोअर) वाढवायचे आहे आणि त्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी आहे. मात्र कंपनीवर अनेक दुकानदार नाराज झाले आहेत आणि त्यांना 1 मे पासून वनप्लस फोनची विक्री थांबवायची आहे.



संबंधित बातम्या

WI vs BAN Test Series 2024 Schedule: वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या कधी, कुठे कसा खेळवले जाणार सामने

Supreme Court On Firecracker Ban: ‘कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही’: दिवाळी फटाके बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले

Afghanistan vs Bangladesh 3rd ODI 2024 Preview: अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगणार तिसरा एकदिवसीय सामना, विजयी संघ मालिकेवर करणार कब्जा; त्याआधी जाणून घ्या सामन्याबद्दल संपुर्ण तपशील

Afghanistan vs Bangladesh, 3rd ODI Live Streaming: अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात आज रंगणार हाय व्होल्टेज सामना, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद