OnePlus ने केली Red Cable Day ची घोषणा; आता दर महिन्याच्या 17 तारेखला मिळणार Exclusive Offers

याचा उद्देश वनप्लस चाहत्यांना विशेष ऑफरचा लाभ देणे आणि कम्युनिटीमध्ये अजून सुधारणा करणे हे आहे. यासह आता कंपनीने दर महिन्याच्या 17 तारखेला ‘रेड केबल डे’ (Red Cable Day) जाहीर केला आहे.

OnePlus Representational Image (File Photo)

वनप्लसने  (OnePlus) डिसेंबर 2019 मध्ये भारतात वनप्लस रेड केबल क्लब (Red Cable Club) सुरू केला. याचा उद्देश वनप्लस चाहत्यांना विशेष ऑफरचा लाभ देणे आणि कम्युनिटीमध्ये अजून सुधारणा करणे हे आहे. यासह आता कंपनीने दर महिन्याच्या 17 तारखेला ‘रेड केबल डे’ (Red Cable Day) जाहीर केला आहे. या दिवशी, वनप्लसच्या चाहत्यांना अनेक नवीन ऑफर्स आणि अतिरिक्त लाभ देण्यात येतील. 17 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या रेड केबल डेला ऑफरचा एक्स्लुझिव्ह वापरकर्त्याचा लाभ मिळेल. मात्र या ऑफर केवळ वनप्लस रेड केबल क्लब प्रोग्राम सदस्यांनाच उपलब्ध असतील.

फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये वनप्लसच्या सर्व वस्तूंवर 5 टक्के सूट आणि वनप्लस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरमधील स्पेअर पार्टसवर 15 टक्के सूट आणि सेवा शुल्कावर 100 टक्के सूट मिळणार आहे. वनप्लस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरवर घेण्यात येणाऱ्या लकी ड्रॉमध्येही हे सदस्य भाग घेऊ शकतील. याचा फायदा मिळवण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी वनप्लसची अधिकृत साइट आणि वनप्लस एक्सपीरियन्स स्टोअर किंवा एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्याशिवाय वनप्लस कम्युनिटी फोरमने असे म्हटले आहे की, वनप्लसच्या साइटवर उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादनांनाही कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय मिळेल. (हेही वाचा: Motorola One Fusion Plus उद्या Flipkart वर सेल , 6GB रॅम असलेल्या या स्मार्टफोनची काय आहेत खास वैशिष्ट्ये)

यासाठी, आपणाला प्रथम प्रथम वनप्लस डिव्हाइस मध्ये OxygenOS ला लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करणे गरजेचे आहे. यानंतर फोन सेटिंग्जवर जाऊन प्रोफाइल सेक्शनवर टॅप केल्यानंतर युजर्सना वनप्लस खात्यात लॉग इन करण्याचा पर्याय मिळेल. यानंतर, आपल्या डिव्हाइसचा IMEI आपल्या वनप्लस खात्याशी लिंक करावा लागेल. हवे असल्यास बायर्स वनप्लस कम्युनिटी अॅपच्या मदतीनेही हे करू शकतात.