Nokia ने नव्या स्मार्टफोन्ससह लाँच केले Lite Earbuds, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत
काळ्या आणि पोलर रंगातील हे ईयरबड्स खूपच आकर्षक आहेत.
नोकिया कंपनीने आज आपले Nokia X सीरिज ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. यात Nokia X10 आणि Nokia X20 हे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. त्यासोबत नोकियाने आज आपले बजेट ईयरबड्ससुद्धा लाँच केले आहेत. Nokia Lite Earbuds असे याचे नाव असून हे ग्लोबली लाँच करण्यात आले आहेत. हे ट्रू वायरलेस ईयरबड्स (Earbuds) आहेत जे दोन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. काळ्या आणि पोलर रंगातील हे ईयरबड्स खूपच आकर्षक आहेत. नोकिया लाईट ईयरबड्स बाजारात येताच ते अन्य ईयरबड्सला तगडी टक्कर देतील.
Nokia Lite Earbuds ची किंमत EUR 39 (जवळपास 3,400 रुपये) इतकी आहे. भारतात हे ईयरबड्स कधी लाँच केले जातील याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने हे ई-स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. कंपनीने असा दावा केला आहे की हे ईयरबड्स 36 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात.हेदेखील वाचा- Nokia X10 आणि NokiaX20 स्मार्टफोन 5G सपोर्टसह लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा Nokia Lite ईयरबड्स 6mm ड्राइवर्ससह येतो. ज्याची फ्रिक्वेंन्सी रेंज 20Hz पासून 20,000Hz पर्यंत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटुथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. या ईयरबड्समध्ये 40mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 6 तास चालते. तर याच्या चार्जिंग केसमध्ये 400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला एकदा पूर्ण चार्ज केल्यास हे ईयरबड्स पाचवेळा चार्ज केले जाऊ शकतात.
यात चार्जिंगसाठी USB Type C जॅक दिला गेला आहे. या ईयरबड्समध्ये 36 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. थोडक्यात नोकियाचे हे ईयरबड्स किंमत आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत अव्वल आहेत. त्यामुळे बाजारात येताच हे अन्य ब्रँडसच्या ईयरबड्स तगडी टक्कर देतील यात काही वाद नाही.
दरम्यान नोकियाने Nokia X सीरिज ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. या सीरिजअंतर्गत Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोन उतरवण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीचे टॉप मॉडेल असून 5जी कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध होणार आहेत. या व्यतिरिक्त फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून काही शानदार फिचर्स दिले गेले आहेत.