Noise Air Buds Mini भारतात लाँच, 15 तासांचा बॅकअप देणा-या या ईयरबड्सची काय आहे किंमत?

Noise Buds Air Mini दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. यात पर्ल व्हाइट आणि जेट ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. आवाज आणि बॅटरी लाईफच्या बाबतीत यात जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहे.

Noise Air Buds Mini (Photo Credits: Noise/Twitter)

Noise कंपनीने भारतात एक जबरदस्त TWS ईयरबड्स लाँच केला आहे. या ईयरबड्स सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 15 तासांचा बॅकअप देण्यात आला आहे. त्याचबरोबर Noise Buds Air Mini हा अधिकृतरित्या लाँच करण्यात आला आहे. या ईयरबड्सची किंमत 1299 रुपये आहे. ही ईयरबड्स फ्लिपकार्ट (Flipkart) आणि नॉइज (Noise) कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन हा ईयरबड्स खरेदी करावा.

Noise Buds Air Mini दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. यात पर्ल व्हाइट आणि जेट ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. आवाज आणि बॅटरी लाईफच्या बाबतीत यात जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Xiaomi कंपनीचा Mi 11 Lite लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या संभाव्य किंमतीसह खासियत

Noise Buds Air Mini च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात क्लिअर साउंट क्वालिटीसाठी 14.2mm चा ड्राइवर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर हा Earbuds TruBass टेक्नोलॉजी आणि वेगवेगळे mics देण्यात आले आहे. ज्यामुळे कॉलिंग दरम्यान तुम्हाला जबरदस्त अनुभव मिळेल. कंपनीने दावा केला आहे की, या ईयरबड्समध्ये 15 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तसेच हे ईयरबड्स 100% चार्ज करण्यासाठी केवळ दोन तास लागतात.

त्याचबरोबर याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात चार्जिंग इंडिकेटर्ससुद्धा दिले गेले आहेत. जे तुम्हाला हा ईयरबड्स चार्ज होण्यास अजून किती वेळ ते दर्शवते. कनेक्टिव्हिटीसाठी यात Hyper Sync technology आणि 5.0 ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. हे ईयरबड्स अॅनड्रॉईड आणि आयओएस या दोघांना सपोर्ट करतो. तुम्ही याला लॅपटॉप आणि कम्प्यूटरलासुद्धा कनेक्ट करु शकता. हा स्मार्ट टच कंट्रोल आणि IPX4 स्वेट रेसिस्टंटसह येतो.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अ‍ॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत

RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement