Instagram ला टक्कर देण्यासाठी आले नवीन Rossgram अॅप; 'या' देशात होणार लॉन्च, जाणून घ्या सविस्तर
इंस्टाग्रामसोबतच रशियामध्ये फेसबुकवरही बंदी घालण्यात आली आहे.
जगातील प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इन्स्टाग्राचा समावेश होतो. आता इंस्टाग्रामला टक्कर देण्यासाठी एक नवीन फोटो शेअरिंग अॅप लाँच केले जात आहे. ज्याचे नाव Rossgram आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाने गेल्या आठवड्यात फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामवर आपल्या देशात बंदी घातली होती. आता रशियाने स्वतःचे फोटो शेअरिंग अॅप रोसग्राम (Rossgram) बनवले आहे. जे 28 मार्चपासून डाउनलोड केले जाऊ शकते. नावाप्रमाणेचं हे अॅप इन्स्टाग्रामसारखेचं असणार आहे.
रोसग्रामचे नाव इन्स्टाग्रामसारखेचं आहे. तसेच या अॅपचे डिझाइन, लेआउट आणि रंगसंगतीही इन्स्टाग्रामप्रमाणेचं ठेवण्यात आली आहे. या अॅपमध्ये क्राउड-फंडिंग आणि विशिष्ट सामग्रीचा सशुल्क प्रवेश देखील समाविष्ट आहे. अॅपचे जनसंपर्क संचालक, अलेक्झांडर झोबोव्ह यांनी सांगितलं की, त्यांना असे काहीतरी घडण्याची अपेक्षा होती आणि म्हणूनचं ते आधीच अॅप विकसित करत होते. (हेही वाचा - Russia-Ukraine War: कीवमध्ये रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनियन अभिनेत्री Oksana Shvets चा मृत्यू)
रशियामध्ये इंस्टाग्रामवर बंदी -
मेटा कंपनीचे फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम 14 मार्च रोजी रशियामध्ये बॅन करण्यात आले होते. इंस्टाग्रामसोबतच रशियामध्ये फेसबुकवरही बंदी घालण्यात आली आहे. आत्तापर्यंत, रोसग्रामवर मेटा प्रमुख मार्क झुकरबर्ग यानी कोणतेही विधान केलेले नाही.
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हे मेटाच्या मालकिचं आहे. अद्याप, रशियामध्ये व्हॉट्सअॅप ब्लॉक करण्यात आलेले नाही. कारण, ते सोशल नेटवर्कऐवजी मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.