New WhatsApp Emojis: व्हॉट्सअॅप वर अपडेट झाल्या नवीन इमोजीस, नेटिझन्सने ट्विटच्या माध्यमातून केले स्वागत
यात Smiling Face with Tear, Disguised Face, Pinched Fingers, Anatomical Heart, Lungs, Ninja यांसारख्या अनेक मजेशीर इमोजीस आहेत.
मोबाईल वापरणा-या जीवनाचा अविभाज्या भाग बनलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) अल्पावधी काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे यूजर्सच्या सोयीनुसार यात अनेक बदल करण्यात आले. मग ते व्हिडिओ कॉल असे, ऑडिओ कॉल वा स्टेटस.... नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे WhatsApp अपडेट झाले असून त्यात नवीन इमोजीस (Emojis) आल्या आहेत. या इमोजीस (Emoticons) आयफोन याआधी अपडेट झाल्या होत्या. मात्र अॅनड्रॉईड फोनमध्ये त्या अपडेट झाल्या नव्हत्या. नुकतेच हे अपडेशन व्हॉट्सअॅप मध्येही आले आहे. या इमोजीस यूजर्सला प्रचंड आवडल्या असून नेटिझन्सने (Netizens) ट्विटच्या माध्यमातून त्याचे कौतुक केले आहे.
यात Smiling Face with Tear, Disguised Face, Pinched Fingers, Anatomical Heart, Lungs, Ninja यांसारख्या अनेक मजेशीर इमोजीस आहेत.
Cute Potted Plant
हेदेखील वाचा- WhatsApp वरुन ट्रेनचे PNR स्टेटस 'या' पद्धतीने मिळवता येणार, जाणून घ्या अधिक
Oh the Resemblance
नेटिझन्सने ट्विटच्या माध्यमातून आपल्या इमोजीस कोणत्या आहेत ते सांगून त्याचे कौतुक केले आहे.
या इमोजीस यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे तुम्हालाही या इमोजीसचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला तात्काळ WhatsApp अपडेट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या इमोजीसचा वापर करता येतील आणि तुमचे चॅटिंग आणखी मजेशीर होईल.