1 डिसेंबर पासून सॅमसंग सोबत 'या' स्मार्ट टीव्ही मध्ये Netflix दिसणार नाही
त्यामध्ये सॅमसंगसह अन्य काही स्मार्ट टीव्ही सुद्धा सहभागी आहेत. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासून स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स काम करणे बंद करणार आहे.
जगप्रसिद्ध ऑनलाईन स्ट्रिमिंग सर्विस नेटफ्लिक्स (Netflix) हे काही टीव्हींना आता येत्या काळात सपोर्ट करणार नाही आहेत. त्यामध्ये सॅमसंगसह अन्य काही स्मार्ट टीव्ही सुद्धा सहभागी आहेत. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासून स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स काम करणे बंद करणार आहे. त्यामध्ये सॅमसंग आणि Roku सहभागी आहेत. कंपनीने असे म्हटले आहे की, 1 डिसेंबर पासून या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स सपोर्ट करणार नाही आहे.
सॅमसंगने या प्रकरणी स्पष्टीकर देत असे म्हटले आहे की, टेक्निकल लिमिटेशन मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सॅमसंगच्या सपोर्ट पेजवर असे म्हटले आहे की, टेक्निकल सपोर्टच्या कारणामुळेच 1 डिसेंबर 2019 पासून जुन्या सॅमसंग स्मार्ट टीव्ही मध्ये काम करणार नाही. भविष्यात नेटफ्लिक्स दुसऱ्या योग्य डिवाइवर सुरु राहणार आहे. कंपनीने फोरमवर असे लिहिले आहे की, 2010 आणि 2011 च्या मॉडेल जे C आणि D पासून सुरु होतात त्यांना नेटफ्लिक्सचे सपोर्ट मिळणार नाही आहे. त्याचसोबत काही डिवाइस असे ही आहेत जे टीव्ही-टीव्ही सोबत जोडलेले असतात. त्यांना मात्र नेटफ्लिक्सचे सपोर्ट मिळणार आहे. जर तुमच्याकडे जुन्या मॉडेलचा टीव्ही असल्यास त्याचा मॉडेल क्रमांक तपासून पाहण्यासाठी त्याच्या पाठील बाजूल देण्यात आलेल्या पॅनलवरील माहिती तपासून घ्यावी.(धक्कादायक! या वर्षातील सर्वात मोठी सायबर चोरी; 1.3 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचे कार्ड डिटेल्स झाले लीक)
तसेच रोकू Roku 2000C, Roku 2050X, Roku 2100X, Roku HD, RokuSD, Roku XD आणि RokuXR मध्ये सपोर्ट करणे बंद करणार आहे. ज्या कंपनीच्या स्मार्ट टीव्ही मध्ये नेटफ्लिक्स चालणार नाही त्याबाबतची अधिक माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिसणार आहे. मात्र 2011 नंतर असलेल्या सॅमसंग मॉडेलच्या स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स सपोर्ट मिळणार आहे. जर तुमच्या टीव्हीमध्ये सुद्धा सपोर्ट देण्यात येत नसल्यास तुम्ही अॅमॅझॉन फायर स्टिक खरेदी करु शकता. ते तुम्ही टीव्ही मध्ये कनेक्ट केल्यास नेटफ्लिक्स पाहू शकता.